पंतप्रधान कार्यालय
आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव- इफ्फीमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय व्यक्तिमत्व-2022 पुरस्कार मिळाल्याबद्दल तेलुगु अभिनेते चिरंजीवी यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
21 NOV 2022 3:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2022
आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव-"इफ्फीमध्ये यंदाचे सिनेसृष्टीतील उल्लेखनीय व्यक्तिमत्व हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलुगु अभिनेते चिरंजीवी यांचं अभिनंदन केलं आहे.
यासंदर्भात, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेल्या ट्विटला प्रतिसाद देत पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले आहे:
"चिरंजीवी गारु उल्लेखनीय व्यक्तिमत्व आहेत.त्यांचे समृद्ध कार्य, वैविध्यपूर्ण भूमिका आणि अतिशय उमदा स्वभाव यामुळे सिनेरसिकांच्या कित्येक पिढ्यांना त्यांनी भुरळ घातली आहे. @IFFIGoa. मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय व्यक्तिमत्व-2022 पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन"
G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1877722)
आगंतुक पटल : 227
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Manipuri
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam