पंतप्रधान कार्यालय
आशियाई चषक स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिचे अभिनंदन केले
Posted On:
20 NOV 2022 10:05AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 20 नोव्हेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई चषक स्पर्धेत कांस्यपदक पटकवणारी टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिचे अभिनंदन केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“आशियाई चषक स्पर्धेत कांस्यपदक मिळवून भारतीय टेबल टेनिस क्षेत्रात इतिहास रचणाऱ्या मनिका बत्रा हिचे मी अभिनंदन करतो. तिच्या यशाने भारतभरातील अनेक खेळाडूंना प्रेरणा मिळेल आणि त्यामुळे टेबल टेनिस हा क्रीडा प्रकार देशात अधिकाधिक लोकप्रिय होईल. @manikabatra_TT”
***
H.Raut/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1877476)
Visitor Counter : 196
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam