पंतप्रधान कार्यालय
अरुणाचल प्रदेश सारख्या महान राज्यासाठी काम करून त्यांना क्षमतेची जाणीव करून देणं हा सन्मान आहे : पंतप्रधान
अरुणाचल प्रदेशातल्या विकास कामांबद्दल लोकांच्या प्रतिक्रियांना पंतप्रधानांनी दिला प्रतिसाद
Posted On:
20 NOV 2022 9:59AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इथं विकास कामांना केलेल्या सुरुवातीनंतर लोकांनी केलेल्या कौतुकाबद्दल ट्विटरच्या माध्यमातून प्रतिसाद दिला आहे. पंतप्रधानांनी काल इटानगर इथं डोंयी पोलो विमानतळाचे उद्घाटन आणि 600 मेगावॅट क्षमतेच्या कामेंगऔष्णिक ऊर्जा केंद्राच लोकार्पण केले.
ईशान्य प्रदेशातल्या हवाई संपर्कात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याबाबत आलेल्या प्रतिक्रियेवर पंतप्रधान म्हणाले की, “ हो, ईशान्य प्रदेशात संपर्क यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. यामुळे जास्त प्रमाणात पर्यटक इथ यायला चालना मिळेल, तसंच ईशान्य भारतातल्या लोकांसाठी देशाच्या इतर भागात प्रवास करणे सुकर होईल.
जेव्हा एका नागरिकानं पंतप्रधानांच्या या राज्यातल्या विकासकामांच्या कटीबद्धतेबाबत प्रशंसा केली, तेव्हा प्रतिक्रियेदाखल मोदी म्हणाले की, ‘अरुणाचल प्रदेशातली जनता ही असाधारण आहे. त्यांच्यात देशभक्तीच्या अनोख्या भावनेचं दर्शन होत. या महान राज्यासाठी काम करून त्यांना क्षमतेची जाणीव करून देणं, हा आपला सन्मान आहे.’
***
H.Raut/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1877470)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam