पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

इस्रायलच्या सार्वत्रिक निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल बेंजामिन नेतन्याहू यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन .


भारत-इस्त्रायल धोरणात्मक भागीदारीला प्राधान्य दिल्याबद्दल मोदींनी पंतप्रधान यायर लॅपिड यांचे मानले आभार

Posted On: 04 NOV 2022 9:03AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, दि. 4 नोव्‍हेंबर, 2022

 

इस्रायलच्या सार्वत्रिक निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल बेंजामिन नेतन्याहू यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन  केले आहे.

भारत-इस्त्रायल धोरणात्मक भागीदारीला प्राधान्य दिल्याबद्दल मोदींनी पंतप्रधान यायर लॅपिड यांचे  आभार मानले आहेत.

पंतप्रधानांनी ट्विटमध्‍ये म्हटले आहे की,

" निवडणुकीतील यशाबद्दल ‘माझेल टोव’ माय फ्रेंड @netanyahu.  भारत-इस्त्रायल धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आपले संयुक्त प्रयत्न सुरू ठेवण्यासाठी मी उत्सुक आहे."

"@yairlapid  भारत-इस्त्रायल धोरणात्मक भागीदारीला आपण  प्राधान्य दिल्याबद्दल धन्यवाद. मला आशा आहे की,  उभय देशातील लोकांच्या परस्पर फायद्यासाठी आपल्यातील  विचारांमध्‍ये  फलदायी देवाणघेवाण सुरू राहील."

***


Shailesh P/Suvarna/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1873636) Visitor Counter : 231