माहिती आणि प्रसारण मंत्रालय

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्वच्छता अभियान 2.0 यशस्वीरित्या केले पूर्ण


माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (आय अँड बी) 4735 क्विंटल भंगार आणि इतर साहित्याची विल्हेवाट लावत, 3.71 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. 1,75,447 चौ. फुटाची जागाही मोकळी केली आहे. 108298 प्रत्यक्ष नस्तींचे (फायलींचे) पुनरावलोकन केले आणि त्यापैकी 66938 बाद केल्या. बाह्य क्षेत्रात 336 मोहीमा राबवल्या आणि 3766 ठिकाणांची स्वच्छता केली.

Posted On: 03 NOV 2022 8:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 नोव्‍हेंबर 2022

 

माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि त्याची संलग्न आणि अखत्यारीतील कार्यालये, स्वायत्त संस्था, वैधानिक संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम जसे की पत्र सूचना कार्यालय (पीआयबी);  सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन (सीबीसी);  प्रकाशन विभाग;  रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया (आरएनआय);  केन्द्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (सीबीएफसी);  इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर (ईएमएमसी);  न्यू मीडिया विंग (एनएमडब्लू); प्रसार भारती (अ. आकाशवाणी, ब. दूरदर्शन); भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय), पुणे; सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एसआरएफटीआय), कोलकाता; भारतीय जनसंवाद संस्था (आयआयएमसी); भारतीय वृत्तपत्र परिषद (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया,पीसीआय); ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स (इंडिया) लिमिटेड (बीईसीआयएल) आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ मर्यादित (एनएफडीसी, विलीन झालेल्या चित्रपट माध्यम विभागासह) यांनी 2 ऑक्टोबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत देशव्यापी विशेष मोहीम 2.0 राबवली. यात  प्रलंबित बाबींचा निपटारा, जुन्या/अनावश्यक नस्ती (फायली) बाद करणे, कार्यालयांची संपूर्ण स्वच्छता आणि जागा व्यवस्थापन आदींवर लक्ष केन्द्रित केले होते. संबंधित मोहिमेची कामगिरी खालीलप्रमाणे आहेतः -

  • खासदारांच्या 14 शिफारशी, 320 सार्वजनिक तक्रारी, 181 पीजी अपील आणि 4 संसदीय आश्वासने मंजूर करण्यात आली आहेत.
  • प्रत्यक्ष 108298 नस्तींचे (फायलींचे) पुनरावलोकन केले, त्यापैकी 66938 बाद केल्या.  2217 ई-फाईल्सचे पुनरावलोकन केले त्यापैकी 1868 बंद केल्या.  1,75,447 चौ. फुटाची जागा मोकळी केली.  3, 71, 66,846/- चा महसूल मिळवला.
  • 336 क्षेत्रीय स्वच्छता मोहीमा राबवण्यात आल्या आणि 3766 ठिकाणे स्वच्छ केली.  मोकळे करण्यात आले.

तयारीचा टप्पा

  • 14 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंतच्या तयारीच्या टप्प्यात, नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती, संलग्न आणि अखत्यारीतील कार्यालये तसेच त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहिमेच्या ठिकाणांची निवड, भंगार आणि अनावश्यक साहित्य कोणते हे ठरवणे,  जुनी कागदपत्रे/नियतकालिके इत्यादींची विल्हेवाट लावण्यासाठी विक्रेत्यांची भाडेतत्त्वावर निवड करणे यांचा यात समावेश होता.
  • माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी 29 सप्टेंबर 2022 रोजी मोहीमपूर्व तपासणीचा एक भाग म्हणून अहमदाबाद दूरदर्शन केंद्राला भेट दिली, यामुळे मंत्रालयाच्या विविध कार्यालयांमध्ये मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रचंड उत्साह निर्माण झाला.
  • मंत्रालयातील अधिकाऱ्यांनीही मोहिमेची सुरुवात करण्यापूर्वी तयारीचा आढावा घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रादेशिक कार्यालयांना भेटी दिल्या.
  • अभियानाच्या यशस्वितेसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयासह विविध मंत्रालयांच्या कार्यालयांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी डीएआरपीजीसह समन्वय/सहयोगाने अंमलबजावणी करण्याकरता मंत्रालयाच्या सर्व माध्यम संस्थासाठी योजना आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली.

मोहिमेचा टप्पा

  • विशेष मोहीम 2.0 2 ऑक्टोबर 2022 रोजी सुरु केल्यावर, डीएआरपीजीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दरदरोज प्रगतीचा आढावा घेण्यात आला. जेणेकरून ते घटनास्थळावरील प्रगतीचा आढावा घेता यावा आणि लक्ष्यांची यशस्वी अंमलबजावणी तसेच पूर्तता करण्यासाठी मार्गदर्शन करता यावे यासाठी मंत्रालयातील अधिकार्‍यांची देखील प्रसारमाध्यम विभाग आणि त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नेमणूक करण्यात आली होती.
  • विशेष मोहीम 2.0 च्या प्रगतीवर DARPG द्वारे दैनंदिन स्वरूपात https://www.pgportal.gov.in/scdpm22 या समर्पित पोर्टलवर देखरेख ठेवण्यात आली. कामगिरीसंदर्भातील एकत्रित डेटा उपरोक्त पोर्टलवर दररोज अपलोड केला जातो.
  • 2 ऑक्‍टोबर ते 31 ऑक्‍टोबर 2022 या कालावधीत विशेष मोहीम 2.0 च्या विविध कृती मुद्यांवर मंत्रालयाने मिळवलेले यश पुढीलप्रमाणे आहे:

Sl. No

Category

Progress as on October 31st, 2022

1

Swachhata Campaign Sites (Outdoor)

336

2

Number of spots where cleaning and disposal has taken place (indoor and outdoor)

3,766

3

Record Management:

Files Reviewed (physical + e-files)

1,10,515

4

Public Grievances + Appeals Redressed

501

5

Revenue Earned

Rs. 3,71,66,846

6

Space Freed ( in Sqr feet)

1,75,447

7

MP’s References

14

8

Parliamentary Assurance 

4

9

Quantity of Scraps/old items/newspapers etc. disposed of (  Qtl.)

4735

 

कृती बिंदू जेथे यश निश्चित केलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे

  1. आऊटडोअर मोहीम (प्रारंभिक लक्ष्य- 196 साध्य- 336)
  2. निपटारा करण्यासाठी भौतिक फाइल्सचे पुनरावलोकन (प्रारंभिक लक्ष्य- 48726 साध्य-108298)
  3. ई-फाईल्सचे पुनरावलोकन (प्रारंभिक लक्ष्य- 86 साध्य-2217)
  4. लक्ष्य दिलेले नसलेल्या ठिकाणांची स्वच्छता - 3766

उल्लेखनीय कामगिरी दाखवण्यासाठी साइट्सचे चित्रीकरण

DARP च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उत्कृष्ट कामगिरी असलेल्या 4 साइट्सचे चित्रीकरण करण्यात आले आणि इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाद्वारे दाखवले गेले. हे आहेत:

दूरदर्शन केंद्र, जयपूर; ii) ऑल इंडिया रेडिओ, जयपूर; iii) ऑल इंडिया रेडिओ, त्रिवेंद्रम आणि iv) सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन (CBC), स्टोअर रूम.

यशोगाथा

  1. डीडीके अहमदाबाद
  2. आकाशवाणीची कामगिरी
  3. CBC (10 वर्षांपेक्षा जास्त बिले आणि नमुना वर्तमानपत्रांचा कचरा काढून टाकण्यात आला.)

विशेष मोहीम 2.0 दरम्यान विविध माध्यमांद्वारे कामगिरीची प्रसिद्धी.

a) Total Number of Tweets

1174

b)Total Number of Videos

318

c)Total no of short films screened

17

d)Total Number of Other Social Media Posts

834

e)PIB Statement issued

3

 

विविध माध्यमांद्वारे प्रसिद्धी अंतर्गत महत्त्वाच्या पोस्ट

विशेष मोहीम 2.0 अंतर्गत अनुक्रमे DDK अहमदाबाद आणि AIR विजयवाडा येथे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री तसेच माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री यांच्या भेटींचे स्थानिक मीडिया कव्हरेज

छपाई माध्यमे

 

 

लघुपटांचे स्क्रीनिंग

विशेष मोहीम 2.0 ची जागरूकता आणि प्रभाव वाढवण्यासाठी फिल्म डिव्हिजनने स्वच्छता या संकल्पनेवर आधारित 7 लघुपट दाखवले. हे चित्रपट पुढीलप्रमाणे आहेत:

धामणेर (10 मि)

सारांश: आपल्या समर्पण आणि परिश्रमाने धामणेरच्या लोकांनी आपले गाव महाराष्ट्र राज्यातील आदर्श गाव बनवले आहे.

चिमू (4 मि.)

सारांश: चिमूला कचरा टाकण्याच्या दुष्परिणामांची जाणीव झाली आणि शहर स्वच्छ कसे ठेवायचे हे इतरांना शिकवले.

चर्चगेट फास्ट (3 मि)

सारांश: थुंकण्याच्या एका साध्या कृतीचा आपल्या समाजावर, पर्यावरणावर आणि आरोग्यावर कसा जबरदस्त परिणाम होतो ते हा चित्रपट दाखवतो.

मिस्टर क्लीन कम्स टू सिटी (3 मि)

सारांश: शहर स्वच्छ ठेवण्याबाबतच्या नागरी भावनांचे चित्रण.

पाईड पायपर ऑफ मुंबई (4 मि.)

सारांश: हा स्वच्छतेवरचा ॲनिमेशन चित्रपट आहे. आरोग्य आणि स्वच्छता ही तुमची जबाबदारी आणि कर्तव्य आहे,असा संदेश यातून दिला जातो. जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही स्वतःचेच आरोग्य कसे धोक्यात घालाल यांची माहिती.

हिसाब दो (3 मि)

सारांश: शहर स्वच्छ कसे ठेवायचे यावर आधारित चित्रपट आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.

प्लास्टिकचे जग (7 मिनिटे)

सारांश: एक ॲनिमेशन चित्रपट ज्यामध्ये भविष्यातील विशाल आणि रखरखीत विदारक भूचित्राचे चित्रण केले आहे. यात पूर्ण पृथ्वी प्लास्टिकच्या कचऱ्याने झाकलेली आहे असे दाखवले असून प्लास्टिक कचऱ्याचा मानवी जीवनावर आणि पर्यावरणावर होणारे घातक परिणाम या विरुद्ध इशारा दिला आहे.

 

31 ऑक्टोबर 2022 नंतरचे महत्त्वपूर्ण /प्रलंबित काम

  1. जुनी / रद्दबातल केलेली वाहने निकाली काढणे - 194
  2. CBC मध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त काळची बिले आणि नमुना वर्तमानपत्रे काढून टाकली जात आहेत.
  3. स्टेशन्स /कार्यालयांचे उर्जा लेखापरीक्षण आकाशवाणीवर सुरू आहे
  4. नॅशनल मीडिया सेंटर (PIB), नवी दिल्ली मध्ये फळबागांच्या संवर्धनात सुधारणा
  5. प्रकाशन विभागाकडून ग्रंथालयांना भेट म्हणून द्यावयाची पुस्तके.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांची दूरदर्शन केंद्र अहमदाबादला भेट.

 

Visit of Shri Apurva Chandra, Secretary (I&B) to Central Bureau of Communication (CBC) Headquarters, Soochna Bhawan

7

3 (1)

* * *

S.Patil/Vinayak/Shraddha/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1873562) Visitor Counter : 177