पंतप्रधान कार्यालय
मोरबी इथे झालेल्या दुर्घटनेसंदर्भात पंतप्रधानांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा
Posted On:
30 OCT 2022 7:51PM by PIB Mumbai
मोरबी इथे झालेल्या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अपघातस्थळी बचाव कार्य लवकरात लवकर सुरु करण्यासाठी त्वरित पथकांची व्यवस्था करावी, असे निर्देश पंतप्रधानांनी यावेळी दिले.
पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात ट्वीट केले आहे:
"पंतप्रधान @narendramodi यांनी गुजरातचे मुख्यमंत्री @Bhupendrapbjp आणि इतर अधिकाऱ्यांशी मोरबी इथे झालेल्या अपघाताबद्दल चर्चा केली. घटनास्थळी त्वरीत बचावकार्य सुरु करण्यासाठी पथके पाठवली जावेत, असे निर्देश त्यांनी दिले. बचावकार्य आणि इतर परिस्थितीवर बारीक देखरेख ठेवावी तसेच, पीडितांना सर्वतोपरी मदत करावी, असेही पंतप्रधानांनी सांगितले.”
***
R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1872076)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam