पंतप्रधान कार्यालय

भारतातील वाद्यांच्या निर्यातीत झालेल्या वाढीचे पंतप्रधानांकडून कौतुक

Posted On: 26 OCT 2022 10:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 ऑक्‍टोबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील वाद्यांच्या निर्यातीत वाढ झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

भारतातील वाद्यांच्या निर्यातीमध्ये, वर्ष 2013 मधील याच कालावधीच्या तुलनेत वर्ष 2022 च्या एप्रिल-सप्टेंबर कालावधीत 3.5 पेक्षा अधिक पटीने वाढ झाली आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे एक ट्विट सामायिक करून, पंतप्रधानांनी ट्विट केले;

"हे उत्साहवर्धक आहे. भारतीय संगीत जगभर लोकप्रिय होत असताना, या क्षेत्रात आणखी वाढ करण्याची  ही उत्तम संधी आहे."

 

* * *

S.Patil/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1871100) Visitor Counter : 168