पंतप्रधान कार्यालय
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
15 OCT 2022 2:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाशी स्वतःला जोडून घेतलेल्या, डॉ. कलाम यांनी एक शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती म्हणून दिलेल्या योगदानाचेही पंतप्रधानांनी स्मरण केले आहे.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहताना पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे की;
“आपले माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन. एक शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती म्हणून त्यांनी आपल्या देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल, तसंच समाजातल्या प्रत्येक घटकाशी स्वतःला जोडून घेणारे एक राष्ट्रपती म्हणून त्यांचा कायमच अभिमान वाटतो.”
* * *
H.Raut/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1868034)
आगंतुक पटल : 289
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam