पंतप्रधान कार्यालय

सुप्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

Posted On: 21 SEP 2022 2:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

राजू श्रीवास्तव यांनी हास्य, विनोदबुद्धी आणि सकारात्मकतेने आपली आयुष्ये उजळून टाकली. ते आपल्याला फार लवकर सोडून गेले. पण गेली अनेक वर्षे विनोदाच्या क्षेत्रात केलेल्या समृद्ध कार्यामुळे असंख्य लोकांच्या हृदयात ते सदैव जिवंत राहतील. त्यांचे निधन अत्यंत दुःखदायक आहे. त्यांचे कुटुंबीय आणि चाहते यांच्याप्रती मी शोक संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.

 

S.Patil /S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1861105) Visitor Counter : 172