पंतप्रधान कार्यालय

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते श्री यूवी कृष्णम राजू गरू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 11 SEP 2022 10:53AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, श्री यूवी कृष्णम राजू गरू यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

"श्री यूवी कृष्णम राजू गरू यांच्या निधनाने दु:ख झाले. येणाऱ्या पिढ्या चित्रपटातील त्यांचा लौकिक आणि सर्जनशीलता लक्षात ठेवतील. समाजसेवेतही ते अग्रेसर होते आणि एक राजकीय नेता म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि चाहत्यांप्रती संवेदना. ओम शांती."

***

ShilpaP/VY/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1858436) Visitor Counter : 129