पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद येथे आयोजित केंद्र-राज्य विज्ञान संमेलनाचे दृकश्राव्य प्रणालीने उद्घाटन
21 व्या शतकातील भारताच्या विकासाची उर्जा म्हणजे विज्ञान आहे, ज्याच्यात प्रत्येक प्रदेश आणि राज्यांचा विकासाला गती देण्याचे सामर्थ्य आहे
चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या दिशेने निघालेलो असताना भारतीय विज्ञान आणि या क्षेत्राशी संबंधित जनतेची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे
नवीन भारताची जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान या तत्वावर आगेकूच सुरू आहे.
विज्ञान हे समस्यांवर समाधान, परिकल्पना आणि नाविन्यपूर्ण संशोधन यांचा आधार आहे
जेव्हा आम्ही आमच्या वैज्ञानिकांनी मिळवलेले यश साजरे करतो, तेव्हा विज्ञान आमचा समाज आणि संस्कृतीचा भाग बनते
सरकार विज्ञानाधिष्ठित विकासाच्या विचारासोबतच काम करत आहे
अधिकाधिक विज्ञान संस्था स्थापन करण्यावर आणि राज्य सरकारांनी केलेल्या प्रक्रियांच्या सुलभीकरणावर जोर देऊन नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देता येईल
सरकारे म्हणून, आम्हाला आमच्या वैज्ञानिकांशी सहकार्य आणि सहयोग करावे लागेल, यामुळे वैज्ञानिक आधुनिकतेचे वातावरण तयार होईल
Posted On:
10 SEP 2022 11:57AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे आयोजित केंद्र-राज्य विज्ञान संमेलनाचे दृकश्राव्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले.
संमेलनाला संबोधित करताना पंतप्रधानांनी या संमेलनाची आयोजन करणारी संस्था ही सबका प्रयास म्हणजे सर्वांच्या प्रयत्नांचे स्पष्ट उदाहरण आहे, यावर प्रकाश टाकला. पंतप्रधानांनी म्हटले की, 21 व्या शतकातील भारताच्या विकासाची उर्जा म्हणजे विज्ञान आहे, ज्याच्यात प्रत्येक प्रदेश आणि प्रत्येक राज्याच्या विकासाला गती देण्याचे सामर्थ्य आहे. आज जेव्हा भारत औद्योगिक क्रांतीच्या दिशेने निघाला असताना भारतीय विज्ञान आणि या क्षेत्राशी संबंधित लोकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. अशा परिस्थितीत, प्रशासन आणि धोरण ठरवण्यात सहभागी लोकांची जबाबदारी महत्वपूर्ण रित्या वाढते.
विज्ञान हे समस्यांवर समाधान, परिकल्पना आणि नाविन्यपूर्ण संशोधन यांचा आधार आहे, यावर पंतप्रधानांनी जोर दिला. आणि यापासून प्रेरणा घेऊन, आजचा भारत हा जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान (संशोधन) यासह आगेकूच करत आहे.
केंद्र आणि राज्यांना सहाय्यकारी होतील, असे इतिहासातील धड्यांवर भाष्य करताना, पंतप्रधान म्हणाले की, अखेरच्या शतकाच्या सुरूवातीच्या दशकांचे स्मरण आम्ही केले तर असे दिसते की विनाश आणि शोकांतिकेच्या काळातून जग कसे वाटचाल करत होते. पण त्या युगातही, पूर्वेकडील जग असो की पश्चिमेकडील, प्रत्येक ठिकाणी वैज्ञानिक महान शोध लावण्यात गुंतले होते. पश्चिमेत, आईनस्टाईन, फर्मी, मॅक्स प्लँक, नील्स बोहर आणि टेस्ला आपल्या प्रयोगांद्वारे जगाला दीपवून टाकत होते. त्याच काळात, सीव्ही रामन, जगदीशचंद्र बोस, सत्येंद्रनाथ बोस, मेघनाद साहा आणि एस चंद्रशेखर हे नवीन संशोधन समोर आणत होते. पंतप्रधान पाश्चात्य आणि पौर्वात्य यांच्यातील फरक अधोरेखित करताना म्हणाले की, आमच्या वैज्ञानिकांच्या संशोधनाला आम्ही द्यावे तितके महत्व देत नव्हतो. जेव्हा आम्ही आमच्या वैज्ञानिकांचे यश साजरे करतो तेव्हा विज्ञान आमचा समाज आणि संस्कृतीचा भाग बनते, याकडे पंतप्रधानांनी दिशानिर्देश केला. मोदी यांनी प्रत्येकाला आमच्या देशातील वैज्ञानिकांचे यश साजरे करण्याची विनंती केली. वैज्ञानिक हे यश साजरे करण्यासाठी देशवासियांना भरपूर साधने पुरवतात. कोरोना प्रतिबंधक लस शोधून जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेतील योगदानाबद्दल त्यांनी भारतीय वैज्ञानिकांच्या भूमिकेची प्रशंसा केली.
विज्ञानाधिष्ठित विकासाच्या विचारधारेसह सरकार काम करत असल्याचा त्यांनी पुनरूच्चार केला. 2014 पासून, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांत लक्षणीय गुंतवणूक होत आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळेच, आज भारत जागतिक नाविन्यपूर्ण संशोधन निर्देशांकात 46 व्या स्थानी असून 2005 मध्ये 81 व्या स्थानी होता, असे पंतप्रधानांनी पुढे सांगितले. देशात विक्रमी संख्येने पेटंट्सची नोंद होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. भारतातील नाविन्यपूर्णता आणि चैतन्यदायी स्टार्टअप्स परिसंस्थेचे वातावरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी आमच्या तरूण पिढीच्या डीएनएमध्येच विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधन हे ठोस भरलेले आहे. या तरूण पिढीला संपूर्ण ताकदीनिशी आम्ही समर्थन देण्याची आवश्यकता आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. तरूणांच्या नाविन्यपूर्ण वृत्तीला समर्थन देण्याकरता त्यांनी संशोधन आणि नाविन्यपूर्ण नवीन क्षेत्रे आणि मिशन्सची यादीच त्यांनी दिली. अंतराळ मिशन, राष्ट्रीय सुपरकम्प्युटिंग मिशन, सेमीकंडक्टर, मिशन हायड्रोजन आणि ड्रोन तंत्रज्ञान यांची उदाहरणे त्यांनी दिली. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण मातृभाषेतून देऊन यास प्रोत्साहन देत आहे.
अमृतकाळात भारताला जागतिक संशोधन आणि नाविन्यपूर्णता यांचे केंद्र बनवण्यासाठी आम्हाला अनेक आघाड्यांवर एकाचवेळी काम करावे लागेल, यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधित संशोधन स्थानिक स्तरावर नेण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला,. त्यांनी राज्यांना त्यांच्या स्थानिक गरजांनुसार संशोधन आणि नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. अधिकाधिक वैज्ञानिक संस्था स्थापन करून आणि राज्य सरकारांच्या प्रक्रियांचे अधिक सुलभीकरण करून नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देता येईल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी पुढे असेही सांगितले की, राज्यांमधील उच्च शिक्षणाच्या संस्थांमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन प्रयोगशाळा वाढल्या पाहिजेत. त्यांनी विज्ञान, नाविन्यपूर्णता आणि तंत्रज्ञान यासंदर्भात राज्यांनी आधुनिक धोरण आखले पाहिजे, असेही आवाहन केले. सरकारे म्हणून आम्हाला आमच्या वैज्ञानिकांशी अधिक सहकार्य आणि सहयोग केला पाहिजे ज्यामुळे वैज्ञानिक आधुनिकता निर्माण होईल, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी अनेक राष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक संस्थांमधील तसेच विद्यमान राष्ट्रीय प्रयोगशाळांची क्षमता आणि तज्ञांच्या विद्वत्तेचा राज्यांनी संपूर्ण लाभ उठवला पाहिजे, यावर जोर दिला. वैज्ञानिक संस्था आणि त्यांच्या तज्ञांचे विचार यांच्यात आदानप्रदान होऊन त्यांचा सर्वोत्कृष्ट फायदा होण्यासाठी आम्हाला विज्ञान संबंधित संस्था राज्याबाहेर नेल्या पाहिजेत, असे पंतप्रधानांनी पुढे सांगितले. तळागाळाच्या स्तरापर्यंत विज्ञानाला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत, असे ते म्हणाले. त्यांनी राज्यांच्या विज्ञान मंत्र्यांना चांगल्या पद्धती आणि त्यांच्या वैज्ञानिक अभ्यासक्रमातील पैलू सामायिक करण्याचा सल्ला दिला.
भाषणाची सांगता करताना पंतप्रधानांनी केंद्र-राज्य विज्ञान संमेलन देशात विज्ञानाच्या प्रगतीला एक नवीन मिती आणि निर्धार प्रदान करेल, असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधानांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एकही संधी दवडू नका, असे आवाहन प्रत्येकाला केले. येती 25 वर्षे भारतासाठी सर्वात महत्वाची आहेत कारण भारताची नवीन ओळख आणि शक्ती ती ठरवणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी सहभागी लोकांना संमेलनातील शिकवण आपापल्या राज्यांत नेऊन राष्ट्र उभारणीत योगदान द्या, असे आवाहन केले.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग हे याप्रसंगी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
देशात नाविन्यपूर्ण संशोधन आणि उद्योजकता यांच्यासाठी सुविधजनक वातावरण तयार करण्याच्या पंतप्रधानांच्या अथक प्रयत्नांच्या धर्तीवर, अशा प्रकारचे पहिलेच विज्ञान संमेलन मजबूत विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्णता (एसआयटी( परिसंस्था देशभराता उभारण्यासाठी सहकारी संघराज्यवादाच्या वृत्तीतून केंद्र आणि राज्ये यांच्यातील समन्वय आणि सहकार्य यंत्रणा मजबूत करेल.
दोन दिवसीय संमेलन अहमदाबाद येथील सायन्स सिटी येथे आज आणि उद्या 11 सप्टेंबर, 2022 ला आयोजित केले आहे. एसआयटी दृष्टीकोन 2047, राज्यांतील एसआयटीच्या वाढीचे पथ आणि दृष्टीकोन; आरोग्य- सर्वांसाठी आरोग्य सेवा; 2030 पर्यंत संशोधन आणि विकास या क्षेत्रात खासगी क्षेत्राची गुंतवणूक दुप्पट करणे; शेतकर्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कृषीमध्ये तांत्रिक हस्तक्षेप; जल-पेयजल निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण संशोधन; उर्जा-सर्व हायड्रोजन मिशनमध्ये सर्व विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या भूमिकेसह स्वच्छ उर्जा; सखोल महासागर मिशन आणि त्याचा किनारपट्टीवरील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी आणि
देशाच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेतील त्यांचे महत्व यांचा त्यात समावेश असेल.
संमेलनात गुजरातचे मुख्यमंत्री, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री, राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि आघाडीचे उद्योजक, व्यावसायिक, एनजीओज, तरूण शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांचा सहभाग राहिला.
***
A.Chavan/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1858269)
Visitor Counter : 300
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam