युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
पहिली खेलो इंडिया महिला ज्युडो स्पर्धा 27 ऑगस्ट 2022 पासून भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या गुवाहाटी केंद्रात सुरू होणार
प्रविष्टि तिथि:
25 AUG 2022 5:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2022
पहिली खेलो इंडिया महिला ज्युडो स्पर्धा 27 ऑगस्टपासून भारतातील चार प्रभागांमध्ये आयोजित केली जाणार आहे. महिलांसाठीच्या क्रीडा स्पर्धांना पाठिंबा देण्यासाठी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने हाती घेतलेल्या प्रमुख उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजे या ज्युडो स्पर्धा आहेत.
राष्ट्रीय फेरीपूर्वी चार प्रभागांमध्ये होणारी ही खुली स्पर्धा विभागीय स्तरावरील मानांकन स्पर्धा आहे. चार वयोगटातील स्पर्धकांची श्रेणी पुढील प्रमाणे आहे:
सब-ज्युनियर (12 ते 15 वर्षे),
कॅडेट (15 ते 17 वर्षे),
ज्युनियर (15 ते 20 वर्षे)
आणि सिनियर (15 वर्षांपेक्षा जास्त ).
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानच्या क्रीडा विभागाने या स्पर्धेच्या आयोजनासाठी एकूण 1.74 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, ज्यामध्ये 48.86 लाख रुपयांच्या बक्षीसांच्या रकमेचा समावेश आहे.
बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या सुशीला देवी यांनी सांगितलं की “ज्युडोसाठी अशी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आणि देशातील खेळांना पुढे नेण्यासाठी पावले उचलल्याबद्दल मी भारतीय ज्युडो फेडरेशन आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे आभार मानते. यामुळे भारतातील ज्युडो क्रीडा प्रकारच्या विकासाला मदत मिळणार आहे.
चारही प्रभागांमधील स्पर्धेनंतर, नवी दिल्लीतील केडी जाधव इनडोअर स्टेडियमवर 20-23 ऑक्टोबर दरम्यान या स्पर्धेची राष्ट्रीय फेरी होणार आहे.
S.Tupe/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1854399)
आगंतुक पटल : 254
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Kannada
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam