रेल्वे मंत्रालय
रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या मुलांसाठी तिकीट काढण्याशी संबंधित नियमात कोणताही बदल नाही
5 वर्षांखालील मुलांसाठी तिकीट खरेदी करणे आणि बर्थ बुक करणे हे प्रवाशांसाठी ऐच्छिक आहे
बर्थ बुक केला नसेल तर 5 वर्षांखालील मुलांना मोफत प्रवासाची परवानगी
प्रविष्टि तिथि:
17 AUG 2022 3:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2022
रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणार्या मुलांसाठी तिकीट काढण्याच्या संदर्भातले नियम भारतीय रेल्वेने बदलल्याचा दावा करणारी काही वृत्ते अलीकडेच माध्यमांतून प्रसिद्ध झाली आहेत. आता एक ते चार वर्षे वयोगटातील मुलांना रेल्वेगाड्यांतून प्रवास करण्यासाठी तिकीट काढावे लागेल, असा दावा या वृत्तांमधून करण्यात आला आहे.
या बातम्या आणि वृत्ते दिशाभूल करणारी आहेत. भारतीय रेल्वेने रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणार्या मुलांसाठी तिकीट बुकींगच्या संदर्भातील नियमांत कोणतेही बदल केलेले नाहीत. प्रवाशांच्या मागणीनुसार, त्यांना त्यांच्या 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासाठी तिकीट खरेदी करण्याचा आणि बर्थ बुक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे आणि जर त्यांना वेगळा बर्थ नको असेल, तर तो प्रवास पूर्वीप्रमाणेच विनामूल्य आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या दिनांक 06.03.2020 च्या परिपत्रकात असे म्हटले आहे की पाच वर्षांखालील मुलांना मोफत नेले जाईल. मात्र स्वतंत्र बर्थ किंवा सीट (चेअर कारमध्ये) दिली जाणार नाही. त्यामुळे जोपर्यंत स्वतंत्र बर्थ मागितला जात नाही तोपर्यंत कोणत्याही तिकीट खरेदीची गरज नाही, पण जर 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बर्थ/सीट ऐच्छिक आधारावर मागितले गेले तर पूर्णपणे प्रौढांसाठीचे भाडे आकारले जाईल.
* * *
S.Tupe/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1852536)
आगंतुक पटल : 857
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam