पंतप्रधान कार्यालय

कन्नड गायक शिवमोग्गा सुब्बण्णा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Posted On: 12 AUG 2022 3:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2022

 

प्रसिद्ध कन्नड गायक शिवमोग्गा सुब्बण्णा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

आपल्या ट्विटर संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले:

असामान्य गायक शिवमोग्गा सुब्बण्णा हे कन्नड गीते आणि संगीताची आवड असलेल्यांच्या घराघरात परिचयाचे नाव होते. त्यांच्या कलाकृतींची प्रशंसा झाली आहे ;त्याचप्रमाणे कन्नड काव्यातील मौल्यवान रत्नांना आजच्या पिढीशी जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.त्यांच्या निधनामुळे तीव्र दुःख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या चाहत्यांच्या दु:खात मी  सहभागी आहे.ओम शांती"

 

S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1851241) Visitor Counter : 146