दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हर घर तिरंगा


देशभरातील पोस्ट कार्यालयांमध्ये राष्ट्रीय ध्वज 25 रुपये दराने उपलब्ध; कोणतेही वितरण शुल्क न घेता तिरंग्याचे वितरण

ई-पोस्ट ऑफिस पोर्टलद्वारे नागरिक राष्ट्रीय ध्वजाची ऑनलाइन खरेदी करू शकतात

12 ऑगस्ट 2022 च्या मध्यरात्री पूर्वी नागरिकांनी ऑनलाइन ऑर्डर द्यावी म्हणजे राष्ट्रध्वजांचे वेळेवर वितरण होईल, पोस्ट विभागाची विनंती

Posted On: 10 AUG 2022 3:24PM by PIB Mumbai

  नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2022

 

देशातील नागरिकांना राष्ट्रीय ध्वज सहज उपलब्ध व्हावा यासाठी, देशभरातील पोस्ट कार्यालये राष्ट्रीय ध्वजांची विक्री रु. 25 दराने करीत आहेत. मोठ्या संख्येने नागरिक ePost Office पोर्टलवर (https://www.epostoffice.gov.in/ProductDetails/Guest_productDetailsProdid=ca6wTEVyMuWlqlgDBTtyTw== ). ऑनलाइन ऑर्डर देत आहेत.

कोणतेही डिलिव्हरी शुल्क न घेता, देशातील कोणत्याही पत्त्यावर पोस्ट विभाग हे ध्वज वितरित करत आहे. ऑनलाइन ऑर्डर केलेल्या राष्ट्रध्वजांची वेळेवर डिलिव्हरी व्हावी यासाठी नागरिकांनी 12 ऑगस्ट 2022 च्या मध्यरात्रीपूर्वी ऑनलाइन ऑर्डर द्यावी, अशी विनंती पोस्ट विभागाने केली आहे.

 

 

 

 

S.Tupe/P.Jambhekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1850487) Visitor Counter : 344