पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मुष्टियुद्धातील रौप्य पदक मिळविल्याबद्दल सागर अहलावत याचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
08 AUG 2022 8:00AM by PIB Mumbai
बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये, पुरुषांच्या 92 किलोहून अधिक वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक मिळविल्याबद्दल सागर अहलावत याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“उत्तम लढा दिलास सागर अहलावत! राष्ट्रकुल स्पर्धेत मुष्टियुद्ध प्रकारात रौप्य पदक मिळविल्याबद्दल त्याचे अभिनंदन. या क्रीडा प्रकारातील भारताच्या शक्तिशाली क्रीडापटूंपैकी हा एक क्रीडापटू आहे आणि त्याचे यश मुष्टीयोद्ध्यांच्या युवा पिढीला प्रेरणा देईल. आगामी काळात भारताची मान अभिमानाने उंचावणारी त्याची खेळी तो यापुढेही कायम ठेवेल हीच सदिच्छा. #Cheer4India”
******
Jaydevi PS/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1849641)
आगंतुक पटल : 195
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam