पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा- 2022 मध्ये 51किलो वजनी गटातील पुरुष मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी अमित पंघालचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
07 AUG 2022 6:56PM by PIB Mumbai
2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 51 किलो वजनी गटात मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीअमित पंघालचे अभिनंदन केले आहे.
आपल्या ट्विटर संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
“राष्ट्रकुल स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या अमित पंघालमुळे देशाच्या पदकांच्या संख्येत आणखी एका पदकाची भर पडली असून देशाच्या प्रतिष्ठेत त्याने भर घातली आहे. तो देशातल्या सर्वात गौरवास्पद आणि कुशल मुष्टियोद्ध्यांपैकी असून,त्यानं आज आपल्या सर्वोच्च कौशल्याचे प्रदर्शन केले आहे. सुवर्णपदक जिंकल्याबद्दल मी त्याचे अभिनंदन
करतो आणि भविष्यासाठी त्याला शुभेच्छा देतो. #Cheer4India"
***
R.Aghor/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1849439)
आगंतुक पटल : 198
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam