पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकुल 2022 स्पर्धेत महिलांच्या 48 किलो वजनी गटाच्या मुष्टियुद्ध सामन्यात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नितू घनसासचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
Posted On:
07 AUG 2022 5:41PM by PIB Mumbai
राष्ट्रकुल 2022 स्पर्धेत महिलांच्या 48 किलो वजनी गटाच्या मुष्टियुद्ध सामन्यात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नितू घनसासचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
“राष्ट्रकुल स्पर्धा, 2022 मध्ये महिलांच्या 48 किलो वजनी गटात, अतिशय परिश्रमपूर्वक मिळवलेल्या या सुवर्णपदकासाठी, नितू घनसासचे खूप खूप अभिनंदन ! तिने अतिशय चिकाटीने आणि अत्यंत जिद्दीने आपले क्रीडा क्षेत्रातली कारकीर्द पुढे नेली आहे. तिच्या या यशामुळे मुष्टियुद्ध खेळ देशात अधिक लोकप्रिय होण्यास मदत होईल. तिच्या भविष्यातील वाटचालीस माझ्या शुभेच्छा !#Cheer4India”
असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं आहे.
***
R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1849432)
Visitor Counter : 176
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam