अर्थ मंत्रालय

जुलै 2022 मध्ये 1,48,995 कोटी रुपये सकल वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) महसूल संकलित


जुलै महिन्यातील जीएसटी महसूल संकलन हे आतापर्यंतचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक आणि गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील महसुलापेक्षा 28% अधिक संकलन

जुलै महिन्यात महाराष्ट्रात 22,129 कोटी रुपये इतके सर्वाधिक जीएसटी संकलन, गोव्यातही जीएसटी महसुलात 43% वाढ

Posted On: 01 AUG 2022 3:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑगस्‍ट 2022

 

जुलै 2022 मध्ये 1,48,995 कोटी रुपये एकूण वस्तू आणि सेवा कर  (जीएसटी) महसूल संकलित झाला असून त्यात केंद्रीय वस्तु आणि सेवा कर म्हणजे सीजीएसटीचा हिस्सा 25,751 कोटी रुपये आहे, राज्यांचा वस्तू आणि सेवा कर एसजीएसटीचा हिस्सा 32,807 कोटी रुपये, आयजीएसटी म्हणजे एकात्मिक वस्तू आणि सेवा कराचा हिस्सा  79,518 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर संकलित 41,420 कोटीं रुपयांसह) आहे आणि उपकराच्या माध्यमातून 10,920 कोटी रुपये महसूल  प्राप्त झाला आहे (वस्तूंच्या आयातीवर संकलित 995 कोटी रुपयांसह). जीएसटी लागू झाल्यानंतरचा हा दुसरा सर्वाधिक महसूल आहे.

सरकारने समझोत्याच्या स्वरूपात  आयजीएसटीमधून सीजीएसटीला 32,365 कोटी रुपये आणि एसजीएसटीला 26,774 कोटी रुपये चुकते केले आहेत. नियमित समझोत्यानंतर , जुलै 2022 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी 58,116 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी  59,581 कोटी रुपये इतका आहे.

जुलै 2022 मधील जीएसटी महसूल  मागील वर्षीच्या याच महिन्यातील 1,16,393 कोटी रुपये जीएसटी  महसुलाच्या तुलनेत 28% इतका  अधिक आहे. जुलै  महिन्यात, वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल 48% जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) प्राप्त  महसूल मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत  या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 22% जास्त आहे.

गेले  सलग पाच महिने, मासिक जीएसटी महसूल संकलन  1.4 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक  असून महसूल संकलन दर महिन्याला भक्कम  वाढ दर्शवत आहे. जुलै 2022 पर्यंत जीएसटी महसुलात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 35% इतकी वाढ झाली असून ही वाढ मोठ्या प्रमाणात उत्साहवर्धक आहे. अधिक चांगल्या प्रकारे अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी जीएसटी  परिषदेने मागील काळात  केलेल्या विविध उपाययोजनांचा हा स्पष्ट परिणाम आहे.जीएसएसटी संकलनाच्या उत्तम नोंदीसह अर्थव्यवस्था रुळावर येण्याचा सकारात्मक परिणाम जीएसटी महसुलावर  सातत्यपूर्ण आधारावर दिसून येत आहे. जून 2022 मध्ये 7.45 कोटी ई-वे देयकांची निर्मिती  झाली, जी मे 2022 मधील 7.36 कोटी देयकांच्या तुलनेत काहीशी अधिक आहे.

जुलै महिन्यात इतर राज्यांच्या तुलनेत  सर्वाधिक जीएसटी संकलन  महाराष्ट्रात  22,129 कोटी रुपये इतके  झाले असून गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत त्यात 17%  वाढ नोंदवण्यात आली.

गोवा राज्याच्या  जीएसटी संकलनामध्येही गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत 43% वाढ झाली असून या जुलै महिन्यात गोव्यात 433 कोटी रुपये इतका जीएसटी  संकलित करण्यात आला.

खालील तक्ता चालू वर्षातील मासिक एकूण जीएसटी महसुलातील कल दर्शवतो. जुलै 2021 च्या तुलनेत जुलै 2022 मध्ये प्रत्येक राज्यात संकलित झालेल्या  जीएसटी महसुलाची राज्यनिहाय  आकडेवारी तक्त्यात देण्यात आली आहे.

 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001ZVUW.png

 

State-wise growth of GST Revenues during July 2022[1]

State

Jul-21

Jul-22

Growth

Jammu and Kashmir

432

431

0%

Himachal Pradesh

667

746

12%

Punjab

1,533

1,733

13%

Chandigarh

169

176

4%

Uttarakhand

1,106

1,390

26%

Haryana

5,330

6,791

27%

Delhi

3,815

4,327

13%

Rajasthan

3,129

3,671

17%

Uttar Pradesh

6,011

7,074

18%

Bihar

1,281

1,264

-1%

Sikkim

197

249

26%

Arunachal Pradesh

55

65

18%

Nagaland

28

42

48%

Manipur

37

45

20%

Mizoram

21

27

27%

Tripura

65

63

-3%

Meghalaya

121

138

14%

Assam

882

1,040

18%

West Bengal

3,463

4,441

28%

Jharkhand

2,056

2,514

22%

Odisha

3,615

3,652

1%

Chattisgarh

2,432

2,695

11%

Madhya Pradesh

2,657

2,966

12%

Gujarat

7,629

9,183

20%

Daman and Diu

0

0

-66%

Dadra and Nagar Haveli

227

313

38%

Maharashtra

18,899

22,129

17%

Karnataka

6,737

9,795

45%

Goa

303

433

43%

Lakshadweep

1

2

69%

Kerala

1,675

2,161

29%

Tamil Nadu

6,302

8,449

34%

Puducherry

129

198

54%

Andaman and Nicobar Islands

19

23

26%

Telangana

3,610

4,547

26%

Andhra Pradesh

2,730

3,409

25%

Ladakh

13

20

54%

Other Territory

141

216

54%

Center Jurisdiction

161

162

0%

Grand Total

87,678

1,06,580

22%

 

 


[1]Does not include GST on import of goods

 

* * *

Jaydevi PS/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1846971) Visitor Counter : 445