पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारोत्तोलक मीराबाई चानूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
30 JUL 2022 11:03PM by PIB Mumbai
बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल 2022 क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारोत्तोलक मीराबाई चानूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"असामान्य @mirabai_chanu ने भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी पुन्हा एकदा केली! तिने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून नवीन राष्ट्रकुल विक्रम प्रस्थापित केल्याचा प्रत्येक भारतीयाला आनंद झाला आहे. तिचे यश अनेक भारतीयांना, विशेषतः नवोदित खेळाडूंना प्रेरणा देईल.
***
SK/SM/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1846678)
अभ्यागत कक्ष : 243
Read this releasein:
Kannada
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam