पंतप्रधान कार्यालय

संसदेच्या पावसाळी सत्र 2022 च्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन

Posted On: 18 JUL 2022 12:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 जुलै 2022 

 

नमस्कार मित्रांनो…

संसदेचे हे सत्र  ऋतुशी  जोडले गेलेले आहे. आता दिल्लीमध्ये सुद्धा पावसानं आपली हजेरी लावण्यास सुरुवात   केली आहे. परंतु तरीसुद्धा बाहेरील गरमी कमी होत आहे परंतु माहिती नाही आतली गरमी कमी होईल किंवा नाही. हा कालावधी एक प्रकारे खूप महत्त्वपूर्ण आहे.  हा आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा कालावधी आहे. 15 ऑगस्ट चे सुद्धा विशेष महत्त्व आहे, आणि आगामी 25 वर्षांसाठी आपला देश शताब्दी साजरी करणार आहे, तर मग आपला  25 वर्षांचा  हा प्रवास कसा असेल,आपण किती वेगाने पुढे चालू ,आपण किती प्रगती करू,आपण किती नवनवीन उंची गाठू, याविषयीचे संकल्प घेण्याचा हा कालावधी आहे आणि या संकल्पाप्रती समर्पित होऊन देशाला एक दिशा देणं, संसदेने देशाचे नेतृत्व केले पाहिजे, संसदेचे सर्व मान्यवर सदस्यांनी राष्ट्रामध्ये एक नवीन ताकद, नवीन ऊर्जा भरण्यासाठी निमित्त बनले पाहिजे.

हे सत्र यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे की, याचवेळी राष्ट्रपती पद आणि उपराष्ट्रपती  पदाची निवडणूक होणार आहे.आज मतदान सुद्धा होणार आहे, आणि या कालखंडात देशाला नवे राष्ट्रपती आणि नवे उपराष्ट्रपती आणि त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

आपण संसदेला नेहमीच संवादाचे एक सक्षम माध्यम मानतो, तीर्थक्षेत्र समजतो.  जिथे खुल्या मनाने संवाद होतात, वेळ आल्यावर वादविवाद सुद्धा होतात, टीका टिप्पणी सुद्धा होतात, खूप उत्तम प्रकारे एखाद्या गोष्टीवर चर्चा होऊन बारकाईनं विश्लेषण केले जावे,  जेणेकरून धोरण ठरवताना  आणि निर्णय घेताना याचं खूप मोठे  सकारात्मक योगदान होऊ शकते.मी सर्व सन्माननीय सदस्यांना आग्रह करतो की, खूप चिंतन, गहन चर्चा आणि उत्तम चर्चेतून आपण संसदेच्या या अधिवेशनाला  जितकं अधिक उत्पादक बनवू, या अधिवेशनाला आधिक फलदायी बनवू ,यासाठी सगळ्यांचा सहकार्य मिळणं गरजेचे आहे,आणि सगळ्यांच्या सहकार्यानेच ही लोकशाही चालत असते, सर्वांच्या प्रयत्नानेच सदनात उत्तम निर्णय होत असतात, आणि यासाठी या सदनाचा लौकिक वाढवण्यासाठी, आपण सगळे आपल्या कर्तव्याचे पालन करून या सत्राचा राष्ट्रहितामध्ये सर्वाधिक उपयोग करून घेऊ आणि प्रत्येक वेळी हे लक्षात ठेवू की,स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपली युवावस्था घालवली, आपलं संपूर्ण जीवन घालवलं, संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवलं, किती टोकाचा त्रास सहन केला.  त्यांच्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करून आणि जेव्हां आता 15 ऑगस्ट समोर आहे तेव्हापर्यंत सदनाचा सर्वाधिक जास्तीत जास्त उपयोग करून घेऊ.  हीच माझी सर्वांना प्रार्थना आहे. 

आपल्या सर्वांचे खूप खूप आभार..


* * *

Jaydevi PS/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1842313) Visitor Counter : 186