पंतप्रधान कार्यालय

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे झालेल्या बस अपघाताबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त


पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून सानुग्रह मदत जाहीर

Posted On: 04 JUL 2022 11:31AM by PIB Mumbai

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात झालेल्या भीषण बस अपघातात झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. या बस दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसाला 2 लाख रुपये आणि जखमी झालेल्यांना 50,000 रुपयांची सानुग्रह मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (पीएमएमआरएफ) पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे झालेला बस अपघात हृदयद्रावक आहे. या दु:खद प्रसंगी माझ्या शोकसंवेदना शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत. मला आशा आहे की, जे जखमी आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होईल. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वोतोपरी मदत करत आहे: पंतप्रधान @narendramodi"

"पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशमधील दुर्दैवी बस दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत मंजूर केली आहे.जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे."

***

STupe/SonalC/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1839023) Visitor Counter : 188