पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष महामहिम व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून केली चर्चा
Posted On:
01 JUL 2022 4:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष महामहिम व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
डिसेंबर,2021 मध्ये राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या भारत भेटीदरम्यान घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचा, उभय नेत्यांनी आढावा घेतला. विशेषत: कृषी उत्पादने, खते आणि औषध उत्पादनांच्या द्विपक्षीय व्यापाराला आणखी प्रोत्साहन कसे देता येईल यावर त्यांनी विचार विनिमय केला.
आंतरराष्ट्रीय ऊर्जा आणि खाद्यपदार्थ बाजारपेठेच्या स्थितीसह जागतिक समस्यांवर देखील उभय नेत्यांनी चर्चा केली.
युक्रेनमधील सद्य परिस्थिती संदर्भात,पंतप्रधानांनी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या बाजूने भारताच्या दीर्घकालीन भूमिकेचा पुनरुच्चार केला.
जागतिक आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर नियमित सल्लामसलत करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.
* * *
S.Kane/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1838601)
अभ्यागत कक्ष : 285
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam