पंतप्रधान कार्यालय
इस्रायलचे पंतप्रधानपद स्वीकारल्याबद्दल महामहिम यायर लॅपिड यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
01 JUL 2022 2:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2022
इस्रायलचे पंतप्रधान पद स्वीकारल्याबद्दल महामहिम यायर लॅपिड यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. भारतासोबत खरी मैत्री निभावल्याबद्दल मोदी यांनी महामहिम नफ्ताली बेनेट यांचे आभार मानले आहेत.
ट्विटच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
"इस्रायलचे पंतप्रधानपद स्वीकारल्याबद्दल महामहिम यायर लॅपिड यांना हार्दिक शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन.आपण दृढ राजनैतिक संबंधांची 30 वर्षे साजरी करत असताना आपली धोरणात्मक भागीदारी पुढे चालू ठेवण्यासाठी मी उत्सुक आहे.”
"भारतासोबत खरी मैत्री निभावल्याबद्दल महामहिम नफ्ताली बेनेट यांचे धन्यवाद. आपल्या फलदायी चर्चा माझ्या स्मरणात राहतील आणि तुम्हाला नवीन भूमिका बजावताना यश मिळावे यासाठी शुभेच्छा."
* * *
Jaydevi PS/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1838505)
आगंतुक पटल : 286
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam