पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 19 जून रोजी 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी ऐतिहासिक मशाल रिलेचा करणार  प्रारंभ


भारत पहिल्यांदाच बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे यजमानपद भूषविणार

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच ऑलिम्पिकच्या धर्तीवर मशाल रिले सुरू करणार

बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे भविष्यातील सर्व मशाल रिले भारतातून होणार सुरू

प्रविष्टि तिथि: 17 JUN 2022 8:00PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.19 जून रोजी नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी क्रीडा मैदानावर  संध्याकाळी 5 वाजता 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी ऐतिहासिक मशाल रिलेचा प्रारंभ करणार आहेत.  यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

यावर्षी, पहिल्यांदाच, ‘फिडेया आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने  ऑलिंपिक परंपरेचा भाग असलेल्या मशाल रिलेचा समावेश बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये केला आहे.  आतापर्यंत अशाप्रकारे बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये मशाल रिलेची समावेश कधीही करण्‍यात आला नव्‍हता.  बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल रिले पद्धत सुरू करणारा  भारत हा पहिलाच देश आहे. विशेष म्हणजे, बुद्धिबळ हा  भारतीय क्रीडा प्रकार असून त्याला  अधिक उंचीवर नेऊन, बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी मशाल  रिलेची  परंपरा यापुढे  भारतात सातत्‍याने सुरू राहणार आहे.  बुदिधबळाच्या स्पर्धा  यापुढे ज्‍या यजमान देशात सुरू होतील, त्‍यापूर्वी तिथे मशाल पोहोचविण्‍यासाठी त्या मशालीचा  सर्व खंडांमध्ये प्रवास होणार आहे.

फिडेचे अध्यक्ष अर्काडी ड्वोरकोविच यांच्या हस्‍ते पंतप्रधानांकडे  मशाल सुपूर्द करण्‍यात येणार आहे.  पंतप्रधान  भारताचे बुद्धीबळपटू ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्याकडे मशाल  सुपूर्द करतील. त्यानंतर चेन्नईजवळील महाबलीपुरम येथे शेवटच्या टप्प्यात ही मशाल येईल. त्यापूर्वी ४० दिवसांच्या कालावधीत ही मशाल ७५ शहरांमध्ये नेण्‍यात येणार आहे.  प्रत्येक ठिकाणी राज्यातील बुद्धिबळ ग्रँडमास्टर्सना मशाल मिळणार आहे.

चेन्नई येथे 28 जुलै ते 10 ऑगस्ट 2022 या कालावधीत 44 वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड होणार आहे. 1927 पासून आयोजित होत आलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच आशियामध्ये भारतात होत  आहे. या स्पर्धेत 189 देशांचे बुदि्धबळपटू सहभागी होणार आहेत. आत्तापर्यंतच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील सहभागी क्रीडापटूंचा विचार करता यंदा  सर्वात जास्‍त संख्‍येने बु‍दधिबळपटू सहभागी होत आहेत.

***

S.Patil/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1834887) आगंतुक पटल : 216
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , Assamese , Tamil , Malayalam , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Telugu