मंत्रिमंडळ

शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांच्या अधिकृत संस्थांमध्ये युवाशक्तीशी संबंधित कामकाज करण्यास सहकार्य करण्याच्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 14 JUN 2022 5:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 जून 2022

 

शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांच्या अधिकृत संस्थांमध्ये युवकांशी निगडीत कामकाज करण्यास सहकार्य करण्याच्या कराराची माहिती आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाला देण्यात आली.

17.09.2021 रोजी SCO अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी या कराराचा स्वीकार केल्यानंतर भारतीय प्रजासत्ताकाच्या केंद्रीय युवक कामकाज आणि क्रीडामंत्र्यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती. रशियन आणि चिनी या भाषा, SCO सचिवालयाच्या अधिकृत कार्यभाषा म्हणून मान्यताप्राप्त आहेत.

यामध्ये पुढील क्षेत्रांबाबत सहकार्य केले जाणार आहे- युवकांबरोबर कार्य करण्याचे क्षेत्र आणि सरकारी युवा धोरण अंमलात आणणाऱ्या सार्वजनिक युवक संघटना यांबाबतच्या सहकार्याला बळकटी देणे आणि आंतरराष्ट्रीय युवक सहकार्य वाढवण्याच्या उद्दिष्टाने कार्यरत उपक्रमांना सहाय्य देणे. तसेच यामध्ये, युवकांबरोबर कार्य करण्याच्या क्षेत्रात व्यावसायिक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, शास्त्रीय/संदर्भ/रीतीविषयक साहित्याचे आदान-प्रदान, सरकारी संस्थांचा तसेच युवाविषयक काम करणाऱ्या सार्वजनिक संस्थांचा, त्याचप्रमाणे सरकारचे युवा धोरण अंमलात आणण्याच्या कामात सहभागी असणाऱ्या इतर संघटनांचा कामाचा अनुभव, आणि युवाविषयक उपक्रमांना सहाय्य; युवा धोरणातील विविध मुद्द्यांबाबत संयुक्त संशोधन आणि अन्य उपक्रम घेणे, शास्त्रीय/ वैज्ञानिक साहित्याची देव-घेव, विध्वंसक कामात युवक युवती सहभागी होण्यास अटकाव करण्यासाठी काय करता येईल, याविषयीच्या संशोधन साहित्याचे आदान-प्रदान, उद्योजकता आणि अभिनव प्रकल्पांमध्ये युवकांना सहभागी करून घेणाऱ्या संयुक्त आर्थिक आणि मानवविषयक उपक्रमांना चालना देणे- जेणेकरून त्यांच्या रोजगारात वृद्धी होईल आणि सुखकर जीवनाचा स्तर उंचावेल; त्याशिवाय, SCO युवा परिषदेच्या उपक्रमांना पाठबळ देणे, याचा समावेश आहे.

त्याशिवाय,  परस्पर विश्वास दृढ करणे, मैत्रीपूर्ण संबंधांना बळकटी आणणे आणि SCO सदस्य देशांतील तरुणांमध्ये सहकार्य वाढविणे- या उद्देशांनी हा करार करण्यात आला आहे.  SCO सदस्य देशांतील मैत्रीपूर्ण संबंध अधिक वृद्धिंगत करण्यात युवा सहकार्य विकसित करण्याच्या घटकाचे महत्त्व ओळखून हा करार करण्यात आला आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय अनुभवांच्या आधारे युवा सहकार्यास अनुकूल स्थिती अधिक सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचा विचार या करारामागे आहे.

 

* * *

R.Aghor/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1833942) Visitor Counter : 128