पंतप्रधान कार्यालय
नागालँडमधील विद्यार्थिनींच्या शिष्टमंडळाचे पंतप्रधानांनी लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी केले स्वागत
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा एक भाग म्हणून शिष्टमंडळाने दिल्लीला दिली भेट
पंतप्रधानांनी शिष्टमंडळाबरोबर मुक्तपणे साधला संवाद
ईशान्येविषयी पंतप्रधानांचे विचार, नागालँडमधील त्यांचे अनुभव, योगचे महत्त्व अशा विविध विषयांवर विद्यार्थिनींनी पंतप्रधानांशी विस्तारपूवर्क केली चर्चा
Posted On:
09 JUN 2022 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागालँडमधील विद्यार्थिनींच्या शिष्टमंडळाचे त्यांच्या लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी स्वागत केले. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा एक भाग म्हणून हे शिष्टमंडळ दिल्लीला आले आहे.
विद्यार्थिनींनी पंतप्रधानांची भेट झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या शिष्टमंडळातील सदस्यांबरोबर पंतप्रधानांनी मुक्तपणे संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांचे ईशान्येबद्दलचे विचार, नागालँडमधील त्यांचे अनुभव, योगचे महत्त्व इत्यादी अनेक विषयांवर चर्चा केली आणि त्यांची मते जाणून घेतली.
या संवादाच्यावेळी पंतप्रधानांनी विद्यार्थिनींनी दिल्लीतील विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्यानंतर आणि येथे फिरल्यानंतर आलेला अनुभव जाणून घेतला. दिल्लीतील वास्तव्यादरम्यान त्यांनी पंतप्रधान संग्रहालय आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देण्याचा सल्लाही दिला.
राष्ट्रीय महिला आयोगाच्यावतीने या शिष्टमंडळाची पंतप्रधानांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
* * *
S.Kakade/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1832746)
Visitor Counter : 171
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam