मंत्रिमंडळ

एस. एन. बोस राष्ट्रीय मूलभूत विज्ञान केंद्र, कोलकाता आणि लीबनिझ-इन्स्टिट्यूट फर फेस्टकोर्पर- अंड वेर्कस्टॉफफोर्स्चंग ड्रेस्डेन इ.व्ही., (IFW ड्रेस्डेन e.V.), ड्रेस्डेन, जर्मनी यांच्यात नवीण चुंबकीय आणि भूप्रदेशीय क्वांटम मटेरियलविषयीच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 08 JUN 2022 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जून 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोलकाता येथील एस. एन. बोस राष्ट्रीय मूलभूत विज्ञान केंद्र(SNBNCBS) आणि  जर्मनीतील लीबनिझ-इन्स्टिट्यूट फर फेस्टकोर्पर- अंड वेर्कस्टॉफफोर्स्चंग ड्रेस्डेन इ.व्ही., (IFW ड्रेस्डेन e.V.), ड्रेस्डेन यांच्यात, झालेल्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली. नवीन चुंबकीय आणि भूप्रदेशीय क्वांटम मटेरियलविषयीच्या या काराराविषयी आज मंत्रिमंडळाला माहिती देण्यात आली.

क्वांटम आधारित तंत्रज्ञानाच्या विकासाच्या संभाव्यतेमुळे  आज क्वांटम मटेरिअल्सवरील संशोधनाकडे जगभराचे लक्ष वेधले गेले आहे. या संयुक्त उपक्रमाचे उद्दिष्ट भारत-जर्मन सहकार्याला चालना देणे, संधी प्रदान करणे आणि चुंबकीय आणि भूप्रदेशीय म्हणजेच टोपोलॉजिकल क्वांटम सामग्रीच्या क्षेत्रातील ज्ञानाची प्रगती सुलभ करणे हे असेल. विशेषत: प्रायोगिक आणि संगणकीय संसाधनांची देवाणघेवाण, तांत्रिक आणि व्यावसायिक समर्थनाची देवाणघेवाण आणि सहयोगी संशोधन करण्यासाठी प्राध्यापक, संशोधकांची देवाणघेवाण यांचा परस्पर सहकार्यात समावेश असेल. या कररांतर्गत, दोन्ही देशांमध्ये परस्परसंवाद, सर्वोत्तम प्रयत्न, परस्पर लाभ आणि वारंवार परस्परसंवादाच्या आधारे आवश्यक  त्या ज्ञानाचा साठा तयार करणे अपेक्षित आहे.

SNBNCBS विषयी माहिती:

एस.एन. बोस राष्ट्रीय मूलभूत विज्ञान संशोधन केंद्र (SNBNCBS) ही एक स्वायत्त संशोधन संस्था आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत 1986 मध्ये नोंदणीकृत संस्था म्हणून तीची स्थापना झाली होती.

IFW विषयी:

IFW ही एक बिगर-विद्यापीठ संशोधन संस्था आहे आणि लीबनिझ असोसिएशनची सदस्य आहे. IFW ड्रेस्डेन आधुनिक साहित्य विज्ञानाशी संबंधित आहे आणि नवीन सामग्री आणि उत्पादनांच्या तांत्रिक विकासासह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि पदार्थ विज्ञानातील शोधात्मक संशोधनावर या संस्थेत भर दिला जातो.


* * *

R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1832222) Visitor Counter : 118