पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी ‘सुशासनाची 8 वर्षे’ याबाबतची माहिती प्रसारित केली
Posted On:
04 JUN 2022 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2022
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आपले संकेतस्थळ narendramodi.in आणि mygov या मंचावरील शासनाच्या गेल्या 8 वर्षांच्या कार्यकाळात केलेले विविध उपक्रम आणि सुधारणा यांची माहिती देणारे लेख आणि ट्वीट प्रसारित केले आहेत. या लेखांमध्ये आणि ट्वीट मध्ये आत्मनिर्भर भारत, प्रशासनाचा लोक-केंद्रित आणि मानवतावादी दृष्टीकोन, संरक्षण क्षेत्रातील सुधारणा आणि गरीब-समर्थक शासनाला चालना देण्याचे प्रयत्न या मुद्द्यांचा समावेश आहे.
आपल्या ट्वीट मालिकेत पंतप्रधान म्हणतात:
“भारताच्या 130 कोटी जनतेने देशाला आत्मनिर्भर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्याच्या आमच्या दृष्टीकोणाची प्रेरणा जागतिक सामृधीमध्ये योगदान देणे ही आहे. #8YearsOfSushasan”
“आमचे सरकार प्रत्येक भारतीयाची काळजी करणारे आहे. आम्ही लोक-केंद्रित आणि मानवतावादी दृष्टीकोनाने प्रेरित आहोत. #8YearsOfSushasan”
“नमो ॲप वरील हा लेख संरक्षण क्षेत्रामधील स्वदेशीकरण, संरक्षण कॉरीडॉर बनवणे, संरक्षण सामुग्रीच्या निर्यातीला चालना देणे या आणि अन्य सुधारणांच्या मालिकेवर प्रकाश टाकतो #8YearsOfSushasan”
“‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास और सब का प्रयास’या मंत्राने प्रेरित होऊन आमच्या सरकारने लोकाभिमुख शासनाला चालना देण्यासाठी विविध प्रयत्न केले आहेत. ज्याचा फायदा गरीब, युवा, शेतकरी, महिला आणि उपेक्षितांना होत आहे. #8YearsOfSushasan”
G.Chippalkatti/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1831115)
Visitor Counter : 220
Read this release in:
Tamil
,
Telugu
,
Odia
,
Bengali
,
Assamese
,
Kannada
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati