युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज जागतिक सायकल दिनानिमित्त किरेन रिजिजू, मनसुख मांडवीय आणि मीनाक्षी लेखी यांच्या उपस्थितीत देशव्यापी कार्यक्रमांचा केला शुभारंभ


फीट इंडिया चळवळ, खेलो इंडिया चळवळ, स्वच्छ भारत चळवळ आणि निरोगी भारत चळवळ या सर्व गोष्टी सायकल चालवून पूर्ण केल्या जाऊ शकतात: अनुराग ठाकूर

अनुराग ठाकूर यांच्यासह मंत्री, खासदार आणि 750 तरुण सायकलस्वारांनी 7.5 किमी अंतर पार केले

नेहरु युवा केंद्राने 75 प्रसिद्ध ठिकाणांसह देशभरात 100 हून अधिक ठिकाणी सायकल रॅली आयोजित केल्या

Posted On: 03 JUN 2022 5:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2022

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी जागतिक सायकल दिनानिमित्त मेजर ध्यानचंद स्टेडियम, नवी दिल्ली येथून केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत राष्ट्रव्यापी कार्यक्रमांना हिरवा झेंडा दाखवला. परराष्ट्र व्यवहार आणि संस्कृती राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

दिल्लीत ध्यानचंद स्टेडियमपासून निघालेल्या सायकल रॅलीचे अनुराग सिंग ठाकूर यांनी नेतृत्व केले. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री आणि खासदार उपस्थित होते. दिल्लीतील 7.5 किलोमीटरच्या रॅलीमध्ये 1500 हून अधिक लोक सहभागी झाले. नेहरू युवा केंद्राने 35 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या राजधानीत 100 पेक्षा अधिक ठिकाणी सायकल रॅली आयोजित केल्या. देशभरातील 75 आयकॉनिक ठिकाणी आयोजित प्रत्येक रॅलीत 75 सहभागींनी भाग घेतला आणि 7.5 किमी अंतर कापले.

रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी अनुराग सिंह ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने देशभरात सायकल रॅली आयोजित करण्याचे अनोखे पाऊल उचलले आहे. आपण स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करत असताना ‘स्वस्थ भारत’ या कार्यक्रमाचा उद्देश लोकांना शारीरिक तंदुरुस्तीसाठी त्यांच्या दैनंदिन जीवनात सायकल चालवण्यास आणि अंगीकारण्यास प्रवृत्त करणे हा आहे, असे त्यांनी सांगितले.

फीट इंडिया, खेलो इंडिया चळवळ, स्वच्छ भारत चळवळ आणि निरोगी भारत चळवळ या सर्व गोष्टी सायकल चालवून पूर्ण केल्या जाऊ शकतात, त्यामुळे प्रदूषणाची पातळीही कमी होईल, सायकलचा वापर करून आपण केवळ स्वतःला तंदुरूस्त ठेवत नाही तर फिट इंडियाचा संदेशही देतो, असे  ठाकूर पुढे म्हणाले. मनसुख मांडवीय आणि किरेन रिजिजू या मंत्र्यांचे उदाहरण देऊन, ठाकूर यांनी अधोरेखित केले की या मंत्र्यांनी नेहमीच सायकलिंगला वाहतुकीचे साधन म्हणून वापरत प्रोत्साहन दिले आहे आणि इतरांना प्रेरणा दिली आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा-India@75 भाग म्हणून युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आज देशभरात जागतिक सायकल दिनाचे आयोजन केले आहे. 12 मार्च 2021 रोजी आझादी का अमृत महोत्सवाच्या आरंभी कार्यक्रमात पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटन भाषणापासून प्रेरणा घेऊन, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने @75 कृती आणि संकल्प या स्तंभाखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची संकल्पना मांडली आहे.

 

S.Thakur/P.Jambhekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1830856) Visitor Counter : 150