रेल्वे मंत्रालय
भारत आणि बांगलादेश यांच्यातील मैत्रीचे बंध पुनर्स्थापित करण्यासाठी प्रयत्न
केंद्रीय रेल्वे मंत्री, श्री अश्विनी वैष्णव,आणि बांगलादेशचे रेल्वे मंत्री,मो. नुरुल इस्लाम सुजन, यांनी संयुक्तपणे मिताली एक्सप्रेसला दाखवले हिरवे निशाण
“मिताली एक्सप्रेस ही मैत्री वृध्दींगत करण्यासाठी, हे धागे दृढ करण्यासाठी, हे नाते सुधारण्यासाठी आणखी एक मैलाचा दगड ठरेल”: श्री अश्विनी वैष्णव
मिताली एक्स्प्रेसमुळे दोन्ही देशांच्या सीमांच्या दोन्ही बाजूंच्या पर्यटन आणि आर्थिक घडामोडींना मिळणार चालना
Posted On:
01 JUN 2022 4:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2022
भारत आणि बांग्लादेश दरम्यान रेल्वेद्वारे लोकांचा आपापसातील संपर्क अधिक दृढ करण्यासाठी, भारत आणि बांग्लादेश सरकारने, अनेक बैठकीनंतर, अलीकडेच पुनर्स्थापना केलेल्या हल्दीबारी-चिलाहाटी या रेल्वे जोडणीद्वारे नवीन प्रवासी रेल्वे सेवा 'मिताली एक्सप्रेस' सुरू करण्याचा निर्णय घेतला.न्यू जलपाईगुडी (भारत) - ढाका (बांगलादेश) -यादरम्यान धावणाऱ्या 'मिताली एक्स्प्रेस' या तिसर्या प्रवासी रेल्वेसेवेचे 27 मार्च, 2021 रोजी दोन्ही पंतप्रधानांच्या हस्ते आभासी पध्दतीने उदघाटन करण्यात आले होते, त्याच रेल्वेगाडीला माननीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव आणि बांगलादेशचे माननीय रेल्वे मंत्री मोहम्मद नुरुल इस्लाम सुजान,यांच्या हस्ते, आज नवी दिल्ली येथील रेल्वे भवन येथून (म्हणजे 1 जून, 2022 रोजी)हिरवे निशाण दाखवण्यात आले.यापूर्वी भारतातील, कोविड महामारीच्या निर्बंधांमुळे ही आगगाडी सुरू होऊ शकली नव्हती.

यावेळी बोलताना श्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, मिताली एक्स्प्रेस ही मैत्री वाढवण्यासाठी, नाते अधिक दृढ करण्यासाठी, संबंध सुधारण्यासाठी आणखी एक मैलाचा दगड ठरेल. दोन्ही देशांमधील सर्व पातळ्यांवर असलेल्या प्रेमळ मैत्रीमुळे विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे. दोन्ही रेल्वेंद्वारे, दरम्यानच्या काळात अनेक सहकार्यात्मक प्रयत्न करण्यात आले आहेत.ही एक अतिशय उत्तम संधी आहे;अशी संधी ज्यामुळे दोन्ही राष्ट्रांकडून आपले संबंध दृढ करण्यासाठी पावले उचलली जातील.
मिताली एक्स्प्रेस ही गाडी आठवड्यात दोनदा धावेल (उदा. न्यू जलपाईगुडीहून रविवारी आणि बुधवारी 11:45 वाजता निघून ढाका येथे 22:30 वाजता पोहोचेल आणि ढाका येथून सोमवार आणि गुरुवारी 21:50 वाजता निघून आणि न्यू जलपाईगुडीला 07:15 तासांनी) पोहोचेल आणि न्यू जलपाईगुडी ते ढाका 595 किमीचे अंतर पार करेल (त्यापैकी 61 किमीचा भाग भारतात आहे). भारतीय रेल्वेद्वारे यात एलएचबी कोच (जसे की मैत्री एक्स्प्रेस आणि बंधन एक्स्प्रेसमध्ये वापरलेले) वापरले जातील ज्यामध्ये 4 फर्स्ट एसी, 4 एसी चेअर कार आणि 2 पॉवर कार असतील.एसी फर्स्ट (केबिन) स्लीपर, एसी फर्स्ट (केबिन) सीट आणि एसी चेअर कार असे तीन वर्ग असतील आणि भाडे अनुक्रमे 44अमेरीकन डॉलर(USD 44),33 अमेरीकन डॉलर(USD 33) आणि 22 अमेरीकन डॉलर(USD 22) इतके असेल.
ही अतिरिक्त नवीन प्रवासी सेवा, मिताली एक्सप्रेस, दोन्ही देशांच्या पर्यटनाला चालना देईल कारण ती बांगलादेशातील उत्तर बंगाल तसेच भारताच्या ईशान्य प्रदेशांना जोडते. यामुळे बांगलादेशी नागरिकांना नेपाळमध्ये भारतातून रेल्वेने प्रवेश करता येईल.
ही नवीन ट्रेन भारत आणि बांग्लादेश दरम्यान कोलकाता-ढाका-कोलकाता मैत्री एक्स्प्रेस (आठवड्यात पाच दिवस) आणि कोलकाता-खुलना-कोलकाता, बंधन एक्स्प्रेस (आठवड्यातून दोन दिवस) या दोन विद्यमान प्रवासी रेल्वे सेवांव्यतिरिक्त सुरू केली आहे.29 मे 2022पासून कोविड महामारीमुळे बंद करण्यात आलेल्या वरील दोन गाड्यांच्या सेवा आता पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.
मिताली एक्सप्रेसचे वेळापत्रक:
13132 NEW JALPAIGURI-DHAKA CANTT. MITALI EXPRESS (BI-WEEKLY)
|
STATION
|
13131 DHAKA CANTT-NEW JALPAIGURI MITALI EXPRESS (BI-WEEKLY)
|
ARRIVAL
|
DEPARTURE
|
|
ARRIVAL
|
DEPARTURE
|
….
|
11.45 (IST)
|
NEW JALPAIGURI
|
07.15 (IST)
|
…..
|
12.55 (IST)
|
13.05 (IST)
|
HALDIBARI
|
06.00 (IST)
|
06.05 (IST)
|
13.55 (BST)
|
14.25 (BST)
|
CHILAHATI
|
05.45 (BST)
|
06.15 (BST)
|
22.30 (BST)
|
……
|
DHAKA CANTT.
|
……
|
21.50 (BST)
|
FREQUENCY
|
EX.NJP
|
SUNDAY & WEDNESDAY
|
EX. DHAKA CANTT
|
MONDAY & THURSDAY
|
G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1830090)
Visitor Counter : 248