पंतप्रधान कार्यालय
क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
24 MAY 2022 4:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मे 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यामध्ये आज व्दिपक्षीय बैठक झाली. टोक्यो येथे आयोजित क्वाड सदस्य देशांच्या शिखर परिषदेनिमित्त आलेल्या नेत्यांबरोबर पंतप्रधान मोदी यांनी स्वतंत्र बैठका घेतल्या.
निवडणुकीतील विजयाबद्दल अँथनी अल्बनीज यांचे पंतप्रधान मोदी यांनी अभिनंदन केले. उभय नेत्यांनी या बैठकीत व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण उत्पादन, नवीकरणीय- अक्षय उर्जा, यांच्यासह हरित हायड्रोजन, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी संशोधन, क्रीडा, आणि लोकांमधील संबंध यांच्यासह सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अंतर्गत बहुस्तरीय सहकार्याचा आढावा घेतला. उभय पंतप्रधानांनी व्दिपक्षीय संबंधामध्ये सकारात्मक गती कायम ठेवण्याची इच्छा व्यक्ती केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी लवकरात लवकर भारत भेट द्यावी, अशी इच्छा व्यक्त करून त्यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले.
S.Kulkarni/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1827917)
आगंतुक पटल : 249
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam