पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

क्वाड सदस्य राष्‍ट्रनेत्यांच्या शिखर परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमामध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 24 MAY 2022 2:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 मे 2022

सन्माननीय महामहीम,

पंतप्रधान किशिदा, पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि राष्ट्राध्‍यक्ष बायडेन

पंतप्रधान किशिदा, आपण केलेल्‍या शानदार आदराति‍थ्‍याबद्दल तुमचे खूप खूप आभार! आज टोकियोमध्‍ये मित्रांबरोबर असणे, माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्‍ट आहे.

सर्वात प्रथम मी, पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचे निवडणुकीतील  विजयाबददल खूप खूप अभिनंदन! त्यांना खूप खूप शुभेच्छा! !

कार्यपदाची शपथ घेतल्यानंतर 24 तासांमध्‍ये ते आपल्यामध्‍ये आहेत, यावरून क्वाड मैत्रीची ताकद आणि याविषयी आपली कटिबद्धता दिसून येते.

महामहीम,

इतक्या कमी अवधीमध्‍ये, क्वाड सम‍ूहाने विश्‍वाच्या पटलावर एक महत्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे.

आज क्वाडला खूप व्यापक संधी मिळत आहे आणि त्याचे स्वरूपही प्रभावी बनले आहे.

आपला परस्परांवरचा विश्‍वास, आपला दृढनिश्चिय, लोकशाही शक्तीला नवीन चैतन्य देत आहे आणि उत्साह निर्माण करीत आहे.

क्वाडच्या स्तरावर आपले परस्पर सहकार्य असल्यामुळे मुक्त, खुल्या आणि सर्व समावेशी इंडो-पॅसिफिक क्षेत्राला प्रोत्साहन मिळत आहे. हेच आपल्या सर्वांचे सामायिक उद्दिष्‍ट  आहे.

कोविड-19 च्या प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये लस वितरण, हवामान बदलाच्या संकटावर कृती, पुरवठा साखळीमध्‍ये लवचिकता, आपत्तीकाळामध्‍ये प्रतिसाद आणि आर्थिक सहकार्य यासारख्‍या अनेक क्षेत्रांमध्‍ये आपापसांमध्‍ये समन्वय वाढविले आहे.

यामुळे हिंद-प्रशांत क्षेत्रामध्‍ये शांती, समृद्धी आणि स्थिरता सुनिश्चित होत आहे.

क्वाड हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी एक विधायक, रचनात्मक कार्यक्रम घेवून वाटचाल सुरू आहे.

यामुळे क्वाडची प्रतिमा एक ‘चांगल्यासाठी शक्‍ती’ या रूपाने अधिकच सुदृढ होत आहे.

खूप खूप धन्यवाद !!


S.Tupe/S.Bedekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1827882) Visitor Counter : 234