पंतप्रधान कार्यालय
श्रीस्वामीनारायण मंदिरात 19 मे रोजी आयोजित 'युवा शिबिर'ला पंतप्रधान संबोधित करणार
प्रविष्टि तिथि:
18 MAY 2022 9:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मे 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 मे 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता करेलीबाग, वडोदरा येथे आयोजित करण्यात आलेल्या 'युवा शिबिर'ला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करतील. श्री स्वामीनारायण मंदिर, कुंडलधाम आणि श्री स्वामीनारायण मंदिर करेलीबाग, वडोदरा हे या शिबिराचे आयोजन करत आहेत.
अधिकाधिक तरुणांना समाजसेवेत आणि राष्ट्रउभारणीत सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एक भारत श्रेष्ठ भारत, आत्मनिर्भर भारत, स्वच्छ भारत इत्यादी उपक्रमांद्वारे नवीन भारताच्या उभारणीसाठी तरुणांना भागीदार बनवण्याचाही उद्देश या शिबिराच्या आयोजनामागे आहे.
S.Kane/S.Auti/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1826518)
आगंतुक पटल : 242
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam