पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींनी   "Modi@20: Dreams Meet Delivery" बद्दल आपले विचार व्यक्त केले

Posted On: 13 MAY 2022 7:11PM by PIB Mumbai

 

"Modi@20: Dreams Meet Delivery" या पुस्तकातील विविध अध्याय लिहिलेल्या प्रसिद्ध  व्यक्तींनी पुस्तकाशी संबंधित  अनुभव आणि संकल्पनांचे कथन केले आहे.  भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी नुकतेच या पुस्तकाचे प्रकाशन केले. हे पुस्तक विविध क्षेत्रातील 22  तज्ञांच्या 21 लेखांचे संकलन आहेज्यामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  20 वर्षांच्या कार्यकाळात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सरकार प्रमुख म्हणून त्यांची  विचारसरणी  आणि कामगिरीचे विविध पैलू उलगडले आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने द यूथ चॅनलन्यू इंडिया जंक्शनने ट्विट केलेले वर्णन  रिट्विट केले आहे .

वर्णनाचे  व्हिडिओ असलेले ट्विट खालीलप्रमाणे आहेत.

भारताची प्रख्यात बॅडमिंटनपटू आणि दोनदा  ऑलिम्पिक पदकपटकवणारी  @Pvsindhu1

"Modi@20:Dreams Meet Delivery" या पुस्तकातील तिच्या प्रकरणाबद्दल

पंतप्रधान हे  निर्विवाद युथ आयकॉन आहे असे ती म्हणते आणि सर्वांना  पटेल असा  युक्तिवाद करते. तिने लिहिलेल्या प्रकरणाचे तिने केलेले थोडक्यात वर्णन  पहा.

"@isolaralliance चे संचालक अजय माथूर  "Modi@20:Dreams Meet Delivery" या पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या  प्रकरणाबद्दल" पीएम मोदी ज्या  कुशलतेने पर्यावरण संरक्षण आणि विकासाच्या  गरजा  हाताळतात , ते या प्रकरणात स्पष्ट केल्याप्रमाणे इतकं आकर्षक आहे.

भारताच्या सांस्कृतिक आणि सभ्यतेचा वारसा जतन आणि पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नांबद्दल "भगीरथ प्रयासी' असे प्रख्यात लेखक @authoramish यांनी  "Modi@20:Dreams Meet Delivery" या पुस्तकात लिहिलेल्या एका प्रकरणासंदर्भात  पंतप्रधान  मोदी यांचे  वर्णन  केले आहे.

संकटकाळात पंतप्रधान मोदी हे सर्वात विश्वासू का आहेत याबाबतचा युक्तिवाद चतुरस्त्र अभिनेते  @AnupamPKher  यांनी Modi@20:Dreams Meet Delivery या पुस्तकातील त्यांच्या अध्यायात केला आहे.

"पंतप्रधान मोदी यांच्या कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल भारताचे प्रमुख कृषी वैज्ञानिक  प्रा. @agulati115 यांनी "Modi@20:Dreams Meet Delivery" या पुस्तकात  लिहिलेल्या प्रकरणात विचार मांडले आहेत.

"पंतप्रधान मोदी यांचे माजी प्रधान सचिव यांनी "Modi@20:Dreams Meet Delivery" या पुस्तकात लिहिलेल्या प्रकरणाबद्दल सांगितले .

पंतप्रधानांची कार्यशैली प्रत्यक्ष जवळून पाहिल्यामुळे श्री. मिश्रा हे त्यांच्या कार्यपद्धतीचे  वर्णन करण्यासाठी योग्य व्यक्ती होते.

666666

''प्रा. मनोज लाडवाअनिवासी भारतीय समुदायातील एक प्रमुख आणि  प्रसिद्ध सदस्य,  "मोदी @20: ड्रीम्स मीट डिलिव्हरी "या पुस्तकातील त्यांच्या प्रकरणाविषयी सांगतात.

भारतातील  प्रख्यात निवडणूक विश्लेषण तज्ज्ञ प्रदीप गुप्ता  यांनी  "मोदी@20: ड्रीम्स मीट डिलिव्हरी" या पुस्तकात त्यांनी, निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदी यांनी कायमस्वरूपी बदल कसा केला यासंदर्भातील प्रकरणाबद्दल सांगितले.

''भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर, "मोदी@20: ड्रीम्स मीट डिलिव्हरी" या पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या  प्रकरणाबद्दल सांगितले.

डॉ जयशंकर यांनी काही अतिशय मनोरंजक वैयक्तिक किस्सेही सांगितले आहेत.

"ज्येष्ठ उद्योजक उदय कोटक यांनी "मोदी@20: ड्रीम्स मीट डिलिव्हरी" या पुस्तकातील त्यांच्या प्रकरणाविषयी बोलतानाखाजगी उद्योगाचे मूल्य आणि संपत्ती निर्मात्यांचा सन्मान ही संकल्पना   विस्ताराने मांडली आहे.

आर्थिक प्रकल्प वेगाने आणि मोठ्या प्रमाणात कार्यान्वित करण्याच्या  पंतप्रधान मोदी यांच्या अनोख्या  क्षमतेवर, भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार, डॉ. व्ही. अनंथा नागेश्वरन यांनी भाष्य केले आहे.

डॉ. VAN, या नावाने ते प्रसिद्ध आहेत, ते "मोदी@20: ड्रीम्स मीट डिलिव्हरी"   या पुस्तकातील त्यांच्या प्रकरणाविषयी सांगतात''

"सीआयआयच्या माजी अध्यक्ष आणि अपोलो समूहाच्या कार्यकारी उपाध्यक्ष  शोभना कामिनेनी  यांनी "मोदी@20: ड्रीम्स मीट डिलिव्हरी"  या पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या प्रकरणावर   भाष्य केले आहे

आता केवळ महिलांचा विकासच नव्हे तर  महिला  प्रणित विकासाचे हे  युग आहे, असे   कामिनेनी सांगतात''

"आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालक, डॉ. सुरजित भल्ला यांनीही  ''मोदी@20: ड्रीम्स मीट डिलिव्हरी"  या पुस्तकातील त्यांनी लिहिलेल्या प्रकरणावर सांगतात.. 

गरिबांपर्यंत पोहोचत  मोदींच्या धोरणांचा सर्वाधिक परिणाम कशाप्रकारे झाला आहे, याच्या बाबतीत युक्तिवाद करण्यासाठी डॉ. भल्ला मार्शल डेटा आणि सखोल  विश्लेषण मांडतात.

भारतातील सर्वात प्रथितयश डॉक्टरांपैकी एक, नारायण हेल्थचे  डॉ. देवी शेट्टी

कोविड-19 महामारीचे व्यवस्थापन करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या धाडसी  प्रयत्नांबद्दल सांगतात

''मोदी@20: ड्रीम्स मीट डिलिव्हरी" या पुस्तकातील त्यांच्या प्रकरणासंदर्भात बोलताना डॉ. शेट्टी''

''मोदी@20: ड्रीम्स मीट डिलिव्हरी" या पुस्तकात लिहिलेल्या प्रकरणावर बोलताना  कोलंबिया विद्यापीठाचे प्रा.अरविंद पांगरीया''

151515

"प्रथितयश तंत्रज्ञ नंदन निलेकणी,''मोदी@20: ड्रीम्स मीट डिलिव्हरी" या पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या प्रकरणावर बोलताना''

"अर्थतज्ज्ञ  आणि लेखिका प्रा. शमिका रवी  यांनी ''मोदी@20: ड्रीम्स मीट डिलिव्हरी" या पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या प्रकरणात त्यांचा अनोखा माहिती आधारित दृष्टिकोन मांडला आहे.''

एकत्रितपणे लाखो लोकांचे जीवन सुधारण्यात मोठा प्रभाव पाडणाऱ्या सूक्ष्म क्रांतीबद्दल प्रा. रवी यांनी भाष्य केले आहे.

''बदलाचे वारे'' यासंदर्भात प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेवी सुधा मूर्ती 'यांनी मोदी@20: ड्रीम्स मीट डिलिव्हरी" या पुस्तकातील त्यांनी लिहिलेल्या प्रकरणावर भाष्य केले आहे.

मूर्ती  यांनी त्यांच्याकडे असलेल्या  एका  अतिशय मनोरंजक किस्याद्वारे भारतात होत असलेल्या बदलांचे वर्णन केले आहे.

***

S.Kane/S.Chavan/P.Kor(Release ID: 1825484) Visitor Counter : 27