पंतप्रधान कार्यालय
कोपनहेगन येथे झालेल्या भारत-डेन्मार्क व्यापार मंचाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांचा सहभाग
Posted On:
03 MAY 2022 10:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन तसेच डेन्मार्कचे राजपुत्र महामहीम फ्रेडरिक यांच्यासह संयुक्तपणे डॅनिश उद्योग महासंघामध्ये भारत-डेन्मार्क व्यापार मंचाच्या कार्यक्रमात सहभागी झाले
पंतप्रधानांनी दोन्ही अर्थव्यवस्थांमधील परस्परपूरक कौशल्य संचाचे महत्त्व विषद केले आणि भारतातील हरित तंत्रज्ञान, कोल्ड चेन्स, टाकाऊ गोष्टींपासून उत्पन्न, नौवहन आणि बंदरे, यांसह इतर क्षेत्रात असलेल्या असंख्य संधींचा लाभ घेण्यासाठी डेन्मार्कच्या कंपन्यांना आमंत्रण दिले. त्यांनी भारताच्या व्यापार स्नेही दृष्टिकोनावर भर दिला आणि दोन्ही देशांमधील व्यापार समुदायांना सहकार्यविषयक संधींचा शोध घेण्याचा आग्रह केला.
दोन्ही देशांदरम्यान दुवा निर्माण करण्यात असलेल्या व्यापार समुदायाच्या भूमिकेवर डेन्मार्कच्या पंतप्रधान फ्रेडरिकसेन यांनी भर दिला.
या कार्यक्रमात दोन्ही देशांमधील खालील विषयांशी संबंधित व्यापार क्षेत्रातील उद्योगांनी भाग घेतला:
- हरित तंत्रज्ञान, अभिनव संशोधन आणि डिजिटलीकरण
- उर्जा स्वयंपूर्णता आणि नूतनीकरणीय उर्जा
- पाणी, पर्यावरण आणि कृषी
- पायाभूत सुविधा, वाहतूक आणि सेवा
व्यापार क्षेत्रातील खालील प्रमुख नेत्यांनी व्यापार मंचाच्या कार्यक्रमात भाग घेतला:
भारतीय व्यापारी प्रतिनिधीमंडळ:
- संजीव बजाज, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, बजाज फिनसर्व्ह मर्या.
- बाबा एनकल्याणी, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, भारत फोर्ज
- महेंद्र सिंघी, व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष, दालमिया सिमेंट (भारत)मर्या.
- रिझवान सोमर, व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष, हिंदुस्तान पोर्टस,
- दर्शन हिरानंदानी, अध्यक्ष, हिरानंदानी गट
- पुनीत चटवाल, व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष, इंडियन हॉटेल्स कंपनी मर्या.
- दीपक बागला, व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष, इन्व्हेस्ट इंडिया
- रितेश अग्रवाल, संस्थापक आणि अध्यक्ष, ओयो रुम्स
- सलील सिंघल, अध्यक्ष एमीरेट्स, पीआय उद्योग मर्या.
- सुमंत सिन्हा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, रिन्यू पॉवर
- दिनेश खारा, अध्यक्ष, भारतीय स्टेट बँक
- सी.पी.गुरनानी, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, टेक महिंद्र मर्या.
- तुलसी तांती, सुझलॉन एनर्जी मर्या.
डॅनिश व्यापारी प्रतिनिधीमंडळ:
- नील्स आगे जेर, मालक, एव्हीके
- पीटर पल्लीशोज, अध्यक्ष, बेट्र
- सी’ट हार्ट,अध्यक्ष, कार्ल्स बर्ग
- जेकॉब,बारूएलपोल्सन, व्यवस्थापकीय भागीदार, कोपनहेगन इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर्स
- जुक्का पेर्टोला, अध्यक्ष,सीओडब्ल्यूआय& सीमेन्स विंड पॉवर
- जोर्गन मॅड्स क्लाऊ सेन, मालक, दान्फोस
- थॉमस प्लेनबोर्ग, अध्यक्ष,डीएसव्ही
- किम वेज्ल्बी हान्सेन, अध्यक्ष, फॉस
- जेन्स मॉबर्ग, अध्यक्ष, ग्रंडफॉस
- रोलँड बान, अध्यक्ष, हल्डोर टॉप्सी
- लार्स पीटरसन, अध्यक्ष, हेम्पेल
- नील्स स्मेडगार्ड, अध्यक्ष, आयएसएस
- ऑलिव्हर फॉन्टन. अध्यक्ष,,एलएमविंड पॉवर ब्लेड्स
- जेन्स-पीटर सोल, अध्यक्ष, रॅम्बोल
- जेन्स बीरगरसन, अध्यक्ष, रॉकवुल
- मॅड्स निप्पर, अध्यक्ष, ऑरस्टेड
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1822459)
|