पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान आणि जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्ट्झ यांच्या भेटीबाबत प्रसिद्धिपत्रक

प्रविष्टि तिथि: 02 MAY 2022 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 मे 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्ट्झ यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.  भारत आणि जर्मनी यांच्यातील द्विवार्षिक आंतर-सरकारी चर्चेच्या  (IGC)  सहाव्या फेरीपूर्वी ही बैठक झाली.

पंतप्रधानांना समारंभपूर्वक मानवंदना  देण्यात आली  आणि फेडरल चॅन्सेलरी येथे चॅन्सेलर शोल्ट्झ यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर उभय नेत्यांची बैठक  झाली आणि त्यानंतर शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली.

धोरणात्मक भागीदारी अंतर्गत द्विपक्षीय सहकार्याची प्रमुख क्षेत्रे तसेच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर यावेळी चर्चा करण्यात आली.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1822155) आगंतुक पटल : 226
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam