आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आयुष्मान भारत- आरोग्य आणि निरामयता केंद्रांनी प्रस्थापित केला नवा विक्रम- “ई-संजीवनी’ या सरकारच्या पथदर्शी सेवेअंतर्गत 26 आणि 27 एप्रिल 2022 रोजी, 3.5 लाख लोकांना टेलि-चिकित्सा देण्याचा विक्रम
Posted On:
28 APR 2022 4:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2022
आयुष्मान भारत- आरोग्य आणि निरामयता केंद्रांनी, आपल्या जवळपासच्या समुदायांना उत्तम दर्जाच्या आरोग्यसेवा देण्याच्या आपल्याला उद्दिष्टाच्या मार्गावरच्या प्रवासात आणखी एक महत्वाचा मैलाचा दगड गाठला आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या, ‘ई-संजीवनी’ या पथदर्शी टेली-सल्ला चिकित्सा सेवेअंतर्गत, 26 आणि 27 एप्रिल 2022 या सलग दोन दिवसांत, 3.5 लाख टेलि सल्ला सेवा देण्यात आल्या आहेत.आजवरच्या या केंद्राच्या इतिहासात, एका दिवसात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने रुग्णांना सल्ला देण्यात आला आहे.
ई-संजीवनीची ही विक्रमी कामगिरी म्हणजे, या सेवेच्या दर्जेदार तंत्रज्ञानाचा पुरावाच आहे. आतापर्यंत, AB-HWCs च्या सुमारे एक लाख शाखांची वैद्यकीय सल्ल्यासाठी नोंदणी झाली असून, 25,000 पेक्षा जास्त केंद्रांतून टेलि-सल्ला सेवा दिल्या जातात. ई-संजीवनीच्या पोर्टलवरुन देशाच्या कानाकोपऱ्यात या सेवा पोहोचवल्या जात आहेत. दर्जेदार आरोग्यसेवा मिळवण्यासाठी, टेलि-सल्ला सेवेत सातत्याने होत असलेली वाढ, अंत्योदयाच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे. टेलि सल्ला हा देशातील दुर्गम भागात राहणाऱ्या, गरीबातल्या गरीब लोकांना, आरोग्यतज्ञाची सेवा पुरवण्यासाठी एक वरदान म्हणून सिद्ध होत आहे.
ई-संजीवनी आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता (AB-HWC):
केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्र योजनेअंतर्गत, डॉक्टर ते डॉक्टर टेलिमेडिसीन सेवा दिल्या जातात. याद्वारे, सर्वसामान्य आणि विशेष आरोग्य सेवा ग्रामीण भागात आणि तुरळक ठिकाणीही दिल्या जातात ई-संजीवनी AB-HWC’ योजना लाभार्थी (महामारी आणि इतर आजार) यांच्यासाठी स्पोक अँड हब याप्रमाणे म्हणजे- डॉक्टर/तज्ञ एका केंद्रांवर बसतात आणि तिथून ते ग्रामीण, दुर्गम भागातल्या डॉक्टरांना उत्तर देतात.
सध्या, ईसंजीवनी- HWC सेवा, 80 हजार पेक्षा अधिक केंद्रावर उपलब्ध आहे. यात, डॉक्टर टू डॉक्टर टेलिमेडिसीन सेवेसाठी, 2.70 लाख पेक्षा अधिक डॉक्टर्सनी दररोज सल्ला सेवा ( 26 आणि 27 एप्रिल) दिली आहे.
ई-संजीवनी ओपीडी: ही रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील थेट सल्ला सेवा असून ज्यातून रुग्णांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने सेवा दिली जाते. ‘ई-संजीवनी ओपिडी- सेवेचा लाभ घेणाऱ्या लोकांची संख्या आता वाढते आहे. ही सेवा मोबाईल अॅप वरही उपलब्ध आहे.
* * *
S.Bedekar/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1820950)
Visitor Counter : 297