पंतप्रधान कार्यालय
तमिळनाडूत तंजावर इथल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदत जाहीर
Posted On:
27 APR 2022 9:51AM by PIB Mumbai
तमिळनाडूतील तंजावर इथल्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. तमिळनाडूतील तंजावर येथे झालेल्या अपघातातील पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनआरएफ) मधून मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट संदेशामध्ये म्हटले आहे ;
"तामिळनाडूतील तंजावर इथल्या दुर्घटनेने खूप दुःख झाले आहे. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या सहवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत अशी आशा व्यक्त करतो: पंतप्रधान"
"तामिळनाडूच्या तंजावर येथे झालेल्या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सानुग्रह मदत म्हणून प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जातील. जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान"
***
JPS/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1820426)
Visitor Counter : 198
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam