पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

प्रसिध्द ओडिया संगीतकार आणि गायक प्रफुल्ल कार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

प्रविष्टि तिथि: 18 APR 2022 9:19AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 18 एप्रिल 2022



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिध्द ओडिया संगीतकार आणि गायक प्रफुल्ल कार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

प्रफुल्ल कार जी यांनी ओडिया संस्कृती आणि संगीत यांच्या प्रती दिलेल्या योगदानाबद्दल ते सदैव स्मरणात राहतील असे मोदी यांनी सांगितले आहे.

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“प्रफुल्ल कार जी यांच्या निधनाने व्यथित झालो आहे. ओडिया संस्कृती आणि संगीत यांच्या प्रती त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ते सदैव आपल्या स्मरणात राहतील. त्यांना बहुआयामी व्यक्तिमत्व लाभले होते आणि त्यांची सर्जनशीलता त्यांच्या कलाकृतींमधून प्रतिबिंबित होते. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती शोकसंवेदना व्यक्त करतो आहे. ओम शांती.”

 

 

****

 

ST/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1817678) आगंतुक पटल : 291
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam