पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातमधील अंबाजी तीर्थधाम येथील साऊंड अँड लाइट शोमध्ये सहभागी होण्याचे पंतप्रधानांचे भाविकांना आवाहन

Posted On: 08 APR 2022 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 एप्रिल 2022

गुजरातमधील अंबाजी तीर्थधाम येथे साऊंड अँड लाइट शोमध्ये सहभागी होण्याचे आवाहन  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाविकांना केले आहे. आज सायंकाळी 7 वाजल्यापासून 51  शक्तीपीठांचा परिक्रमा महोत्सव सुरू होत असल्याची माहिती त्यांनी दिली. आपली  पुराणे साउंड आणि लाईट शोमध्ये प्रदर्शित केली जातील.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"गुजरातमधील अंबाजी तीर्थक्षेत्र येथे भाविकांसाठी एक अतिशय शुभ सोहळा आहे.51 शक्तीपीठांच्या परिक्रमा महोत्सवाला आज सायंकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात होत आहे. या साउंड आणि लाईट शोमध्ये आपल्या पुराणांचे आकर्षक सादरीकरण केले जाईल. मी तुम्हा सर्वांना आवाहन  करतो की या भव्य  सोहळ्याचा  भाग व्हा."

 

S.Kane/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1814843)