माहिती आणि प्रसारण मंत्रालय

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (एव्हीजीसी) प्रोत्साहन कृती दलाची केली स्थापना


माहिती आणि प्रसारण (आय अँण्ड बी) सचिवांच्या अध्यक्षतेखालील कृती दल 90 दिवसांच्या आत पहिला कृती आराखडा सादर करणार

कृती दलात उद्योग, शैक्षणिक संस्था आणि राज्य सरकारांचेही प्रतिनिधित्व

Posted On: 08 APR 2022 10:46AM by PIB Mumbai

·     एव्हीजीसी प्रोत्साहन कृती दलाच्या निर्मितीची घोषणा माननीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली होती.

·       एव्हीजीसी उद्योगातील भागीदार हे भागधारक असतील

·     आशय निर्मिती क्षेत्रात भारत आघाडीवर राहील.

·      एव्हीजीसी क्षेत्राच्या वाढीच्या धोरणांचे मार्गदर्शन करण्यासाठी

·      उद्योगाला सक्रियपणे सहकार्य करण्यासाठी

·      भारतीय एव्हीजीसी उद्योगाचे जागतिक स्थान उंचावण्यासाठी


1. भारतातील अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक (एव्हीजीसी) क्षेत्रामध्ये ‘भारतात निर्मिती’ आणि ‘भारतीय नाममुद्रेचे’  ध्वजवाहक बनण्याची क्षमता आहे.  भारतामध्ये 2025 पर्यंत वार्षिक सुमारे 25-30% वाढीसह आणि दरवर्षी 1,60,000 हून अधिक नवीन रोजगार निर्माण करत जागतिक बाजारपेठेतील 5% (~40 अब्ज डॉलर्स) वाटा काबीज करण्याची क्षमता आहे.

 

2. एव्हीजीसी क्षेत्राची व्याप्ती आणखी वाढवण्यासाठी, 2022-23 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (एव्हीजीसी) प्रोत्साहन कृती दलाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली होती, जेणेकरुन या कृती दलाच्या शिफारशींनुसार या क्षेत्रातील स्थानिक बाजारपेठ आणि जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी देशांतर्गत क्षमता निर्माण करता येतील.

 3. केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मधील घोषणेच्या अनुषंगाने, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत देशातील एव्हीजीसी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (एव्हीजीसी) प्रोत्साहन कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे.

 

4. एव्हीजीसी प्रोत्साहन कृती दलाचे अध्यक्ष माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव असतील,

आणि 

 ए)  कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय;

 बी)  उच्च शिक्षण विभाग,

 सी)  शिक्षण मंत्रालय;

 डी)  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि,

 ई ) उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग  यांचे सचिव या कृती दलात असतील.


 यात उद्योगात भागीदारांचाही व्यापक सहभाग असेल, उदाहरणार्थ

 

ए.   बिरेन घोष, टेक्निकलर इंडियाचे देशातील प्रमुख

बी.  आशिष कुलकर्णी, संस्थापक, पुनर्युग आर्टव्हिजन प्रा.  लि.;

सी.  जेश कृष्ण मूर्ती, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एनीब्रेन;

डी.  केतन यादव, सीओओ आणि व्हीएफएक्स निर्माता, रेडचिलीज व्हीएफएक्स;

 ई.  चैतन्य चिंचलीकर, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल;

 एफ.  किशोर किचिली, झिंगा इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि देशातील प्रमुख,

 जी.  नीरज रॉय, हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी.

 

5. एव्हिजीसी प्रोत्साहन कृतीदलात कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा या राज्य सरकारांचाही समावेश असेल; अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन), राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परीषद (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग) यासारख्या शैक्षणिक संस्थांचे प्रमुख आणि, एमईएससी, फिक्की, उद्योग आणि सीसीआय या संस्थांवर प्रतिनिधी असतील

 

6. भारत सरकार, राज्य सरकारे आणि प्रमुख उद्योगांचा सहभाग यासह एव्हिजीसी प्रमोशन टास्क फोर्सची निर्मिती या क्षेत्राच्या वाढीच्या धोरणांना मार्गदर्शन करण्यासाठी संस्थात्मक प्रयत्नांना चालना देऊन, मानके प्रस्थापित करून या क्षेत्राच्या वाढीसाठी लक्ष्यवेधी कामगिरी करेल.  भारतातील एव्हिजीसी मधील शिक्षणासाठी, उद्योग आणि आंतरराष्ट्रीय एव्हिजीसीच्या संस्थांसोबत सक्रियपणे सहकार्य करेल  आणि भारतीय एव्हिजीसीच्या उद्योगाची जागतिक स्तरावरील स्थिती सुधारेल.

 

कृती दलासाठी संदर्भ अटींमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  (i)  राष्ट्रीय एव्हिजीसीसाठी धोरण तयार करणे,

 (ii)  एव्हिजीसी संबंधित क्षेत्रातील पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमाची शिफारस करणे,

 (iii)  शैक्षणिक संस्था, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे आणि उद्योग यांच्या सहकार्याने कौशल्य उपक्रम सुलभ करणे,

 (iv)  रोजगाराच्या संधी वाढवणे,

 (v)  भारतीय एव्हिजीसी उद्योग जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी प्रोत्साहन आणि बाजार विकासासाठी कार्यचालन सुलभ करणे,

 (vi)  निर्यात वाढवा आणि एव्हिजीसीच्या क्षेत्रात विदेशी थेट गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रोत्साहनाची शिफारस करणे.

 

 7. एव्हिजीसी प्रमोशन टास्क फोर्स 90 दिवसांच्या आत आपला पहिला कृती आराखडा सादर करेल.

***

RA/VG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1814781) Visitor Counter : 289