पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी, राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त भारताच्या गौरवशाली सागरी इतिहासाचे स्मरण केले

Posted On: 05 APR 2022 10:07AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त भारताच्या गौरवशाली सागरी इतिहासाचे स्मरण केले आहे.  भारताच्या आर्थिक वाढीसाठी सागरी क्षेत्र महत्त्वाचे असल्याचे सांगत, गेल्या 8 वर्षांत भारत सरकारने बंदर आधारित  विकासावर लक्ष केंद्रित केले आहे,ते  आर्थिक वाढीसाठी आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासाठी आवश्यक आहे असे ते म्हणाले.  सागरी परीसंस्था आणि विविधता सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकार पुरेशी काळजी घेत आहे यावरही त्यांनी भर दिला.

ट्विट संदेशांच्या एका भागात पंतप्रधान म्हणाले;

"राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त आज आपण आपल्या गौरवशाली सागरी इतिहासाचे स्मरण करत आहोत. भारताच्या आर्थिक विकासासाठी सागरी क्षेत्राचे महत्त्वही अधोरेखित करत आहोत. गेल्या 8 वर्षांत आपल्या सागरी क्षेत्राने नवी उंची गाठली आहे आणि व्यापार तसेच व्यावसायिक व्यवहारांना चालना देण्यासाठी योगदान दिले आहे."

" भारत सरकारने, गेल्या 8 वर्षांमध्ये बंदर आधारित विकासावर लक्ष केंद्रित केले आहे, यात बंदर क्षमता वाढवणे आणि विद्यमान प्रणाली अधिक कार्यक्षम बनवणे समाविष्ट आहे. भारतीय उत्पादनांना नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी जलमार्गांचा वापर केला जात आहे."

" आर्थिक प्रगतीसाठी सागरी क्षेत्राचा लाभ घेत असताना आणि आत्मनिर्भर भारताची उभारणी करत असताना, भारताला ज्या सागरी पर्यावरणाचा आणि विविधतेचा अभिमान वाटतो त्याचे रक्षण करण्यासाठी आपण पुरेशी काळजी घेत आहोत."


***

SK/VG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1813539) Visitor Counter : 247