माहिती आणि प्रसारण मंत्रालय

अनुराग ठाकूर यांनी प्रक्षेपकांसाठी ब्रॉडकास्ट सेवा पोर्टलचा केला प्रारंभ


या पोर्टलमुळे परिसंस्थेत पारदर्शकता, जबाबदारी व प्रतिसादशीलता वाढीस लागेल - अनुराग ठाकूर

हे पोर्टल लवकरच ‘राष्ट्रीय एक खिडकी यंत्रणे’ला ( NSWS) जोडणार - अनुराग ठाकूर

900 हून अधिक उपग्रह टीव्ही वाहिन्या, 70 हून अधिक टेलिपोर्ट चालक, 1750 हून अधिक बहुविध सेवा चालक , 350 हून अधिक कम्युनिटी रेडिओ केंद्रे (CRS) , 380 हून अधिक खाजगी एफ एम वाहिन्या व इतरांना सर्व तऱ्हेच्या सेवा पोर्टल उपलब्ध करून देणार

प्रक्षेपण क्षेत्रात व्यवसायसुलभता आणण्यासाठी हे महत्वाचे पाऊल

या पोर्टलमध्ये केवळ एका क्लिक द्वारे सर्व समस्यांचे निराकरण करण्याची सुविधा

Posted On: 04 APR 2022 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 एप्रिल 2022

 

केंद्रीय माहिती व प्रसारण तसेच युवक व्यवहार व क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज नवी दिल्ली इथे ब्रॉडकास्ट सेवा पोर्टलचा प्रारंभ केला. प्रक्षेपण क्षेत्रात व्यवसायसुलभता आणण्याच्या दृष्टीने  हा नवा अध्याय  ठरणार आहे. प्रक्षेपकांना विविध परवाने व  परवानग्या ऑनलाईन मिळवण्यासाठी तसेच ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी हे  ब्रॉडकास्ट सेवा पोर्टल उपयोगी पडणार आहे.

सरकारने या प्रणालीत पारदर्शकता तसेच जबाबदारीची भावना आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याचे अनुराग सिंग ठाकूर यावेळी म्हणाले.  या पोर्टलमुळे आवेदनकर्त्यांच्या आवेदनांवर प्रक्रिया होण्याचा वेग वाढेल, तसेच आवेदनाची सद्यस्थिती वेळोवेळी पाहता येईल. याआधी आवश्यक असलेला मानवी सहभाग या पोर्टलमुळे आता गरजेचा  राहणार नाही व त्यामुळे मंत्रालयाची क्षमता वाढेल आणि व्यवसायसुलभतेतही वाढ होईल.

विविध परवानग्या मिळवणे, नोंदणीसाठी आवेदन करणे, आवेदनांची सद्यस्थिती तपासणे, शुल्कनिर्धारण तसेच शुल्काचा ऑनलाईन भरणा  इत्यादी सेवांसाठी सर्व हितधारकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. ‘डिजिटल भारत’ मोहिमे अंतर्गत या सुविधा सर्व खाजगी टी व्ही उपग्रह वाहिन्या, टेलिपोर्ट संचालक, बहुविध सेवा चालक (MSOs) तसेच  कम्युनिटी व खाजगी रेडिओ वाहिन्यांना उपलब्ध करून दिल्या जातील .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘कमीतकमी शासन व जास्तीत जास्त सुशासन’ या मंत्राला मूर्त रूप देण्यासाठी हे पोर्टल म्हणजे एक मोठी झेप असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. “वापरण्यास अतिशय सुलभ असलेल्या या पोर्टलमध्ये केवळ एका क्लिकद्वारे सर्व समस्यांचे निराकरण करण्याची सुविधा आहे.  900 हून अधिक  उपग्रह वाहिन्या, 70 हून अधिक  टेलिपोर्ट चालक, 1700  हून अधिक  बहुविध सेवाचालक , 350 हून अधिक  कम्युनिटी रेडिओ केंद्रे  (CRS) , 380 हून अधिक  खाजगी एफ एम वाहिन्या व इतरांना सर्व तऱ्हेच्या सेवा उपलब्ध करून देणाऱ्या या पोर्टलमुळे व्यावसायिक वातावरण सुधारेल व संपूर्ण प्रक्षेपण क्षेत्राला सक्षम बनवेल.”

या पोर्टलच्या चाचणीला वापरकर्त्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. या पोर्टलला लवकरच राष्ट्रीय एक खिडकी प्रणालीला (NSWS) जोडण्यात येणार असून वापरकर्त्यांनी त्यामध्ये काही सुधारणा सुचवल्यास त्यावर विचार केला जाईल असेही ते म्हणाले.

या पोर्टलच्या एक महिनाभर चाललेल्या चाचणी दरम्यान वापरकर्त्यांनी सुचवलेल्या सुधारणांना लक्षात घेऊन  आधीच्या आवृत्तीत अनेक बदल केले गेले असल्याचे  माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी सांगितले.

या पोर्टलमुळे परिसंस्थेत पारदर्शकता, जबाबदारी व प्रतिसादशीलता वाढीस लागेल. सर्व माहिती एकाच डॅशबोर्ड वर उपलब्ध असेल. या पोर्टलची काही वैशिष्ट्ये व सुविधा :

  • सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व प्रक्रिया अंतर्भूत
  • शुल्क भरण्यासाठी ‘भारत कोष’ या यंत्रणेशी समन्वय
  • इ ऑफिस व हितधारक मंत्रालयाशी समन्वय
  • विश्लेषण, माहिती संकलन व व्यवस्थापन माहिती यंत्रणा ( MIS)
  • एकीकृत हेल्पडेस्क
  • आवेदने व सद्यस्थिती पाहणी
  • पत्रे व आदेश पोर्टलमधूनच थेट डाउनलोड करण्याची सोय
  • एस एम एस  अथवा इ मेल मार्फत हितधारकांशी संपर्क

या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व प्रक्षेपकांनी या पोर्टलच्या प्रारंभाचे स्वागत केले व आवेदनांच्या प्रक्रियेला लागणारा  वेळ व त्रास  या पोर्टलमुळे नक्कीच कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

भारतातील व्यवसाय वातावरणात सुधारणा घडवून आणणे यावर भारत सरकार विशेष भर देत असून या पोर्टलमुळे सरकारची व्यवसायसुलभता आणण्याप्रती व प्रक्षेपण क्षेत्राला सक्षम बनवण्याप्रती वचनबद्धता स्पष्ट होते.

http://davp.nic.in/ebook/bsp/Broadcast_Seva_Portal/index.html

ब्रॉडकास्ट सेवा पोर्टलच्या उदघाटनाचा  कार्यक्रम खालील लिंकवर पाहता येईल.

* * *

S.Kakade/U.Raikar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1813317) Visitor Counter : 266