अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जानेवारी 2022 मध्ये संकलित 1,40,986 कोटी रुपयांचा पूर्वीचा विक्रम मोडत मार्च 2022 मध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक एकूण जीएसटी संकलन


मार्च महिन्यात 1,42,095 कोटी रुपये एकूण जीएसटी महसूल संकलित

Posted On: 01 APR 2022 5:52PM by PIB Mumbai

 

मार्च 2022 मध्ये एकूण जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर महसूल संकलन 1,42,095 कोटी रुपये आहे ज्यामध्ये सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 25,830 कोटी रुपये, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 32,378 कोटी रुपये, आयजीएसटी अर्थात एकात्मिक वस्तू आणि सेवा करापोटी 74,470 कोटी रुपये ( माल आयातीवर संकलित झालेल्या 39,131 कोटी रुपयांसह) आणि उपकर महसूल 9,417 कोटी रुपये (माल आयातीवर संकलित केलेल्या 981 कोटी रुपयांसह) यांचा समावेश आहे. जानेवारी 2022 मध्ये संकलित 1,40,986 कोटी रुपयांचा पूर्वीचा विक्रम मोडत मार्च 2022 मध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक एकूण जीएसटी संकलन झाले आहे.

सरकारने नियमित समझोत्याच्या स्वरूपात  म्हणून आयजीएसटीमधून सीजीएसटीला 29,816 कोटी रुपये आणि एसजीएसटीला 25,032 कोटी रुपये चुकते केले आहेत. याशिवाय केंद्राने या महिन्यात आयजीएसटीचे 20,000 कोटी रुपये  केंद्र सरकार आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 50:50 च्या प्रमाणात तात्पुरत्या आधारावर  चुकते केले आहेत. नियमित आणि तात्पुरत्या समझोत्यानंतर मार्च 2022 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी 65646 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 67410 कोटी रुपये आहे. केंद्राने मार्च 2022 मध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 18,252 कोटी रुपये जीएसटी भरपाईही जारी केली.

मार्च 2022 मध्ये संकलित महसूल  मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 15% आणि मार्च 2020 मधील जीएसटी महसुलापेक्षा 46% अधिक आहे. या महिन्यात, मालाच्या आयातीतून मिळणारा महसूल 25% अधिक होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 11% अधिक आहे. फेब्रुवारी महिन्याचे दिवस कमी असूनही फेब्रुवारी 2022  या महिन्यात बनवलेल्या इ वे बिलांची संख्या जानेवारी 2022 (6.88 कोटी) च्या तुलनेत जास्त म्हणजे 6.91 कोटी आहे जी व्यावसायिक उलाढाली जलद गतीने सावरण्याचे द्योतक आहे.

पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत अनुक्रमे ₹1.10 लाख कोटी, ₹1.15 लाख कोटी आणि 1.30 लाख कोटीं रुपयांच्या सरासरी मासिक संकलनाच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2021-22 च्या शेवटच्या तिमाहीत सरासरी मासिक एकूण जीएसटी संकलन 1.38 लाख कोटी रुपये आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यासह करचोरीविरोधी कारवाई , विशेषतः बनावट देयके देणाऱ्यांवर कारवाई या बाबी  वाढलेल्या जीएसटी संकलनात योगदान देत आहेत. पर्यस्त शुल्क रचनेत सुधारणा करण्यासाठी परिषदेने  केलेल्या विविध दर तर्कसंगत उपायांमुळेही महसुलात सुधारणा झाली आहे.

खालील तक्त्यामध्ये चालू वर्षातील मासिक एकूण जीएसटी महसुलातील कल दर्शविला आहे. मार्च 2021 च्या तुलनेत मार्च 2022 मध्ये प्रत्येक राज्यात संकलित झालेल्या जीएसटी ची राज्यवार आकडेवारी तक्त्यात दिली आहे.

State-wise growth of GST Revenues during March 2022[1]

 

State

Mar-21

Mar-22

Growth

1

Jammu and Kashmir

352

368

5%

2

Himachal Pradesh

687

684

0%

3

Punjab

1,362

1,572

15%

4

Chandigarh

165

184

11%

5

Uttarakhand

1,304

1,255

-4%

6

Haryana

5,710

6,654

17%

7

Delhi

3,926

4,112

5%

8

Rajasthan

3,352

3,587

7%

9

Uttar Pradesh

6,265

6,620

6%

10

Bihar

1,196

1,348

13%

11

Sikkim

214

230

8%

12

Arunachal Pradesh

92

105

14%

13

Nagaland

45

43

-6%

14

Manipur

50

60

18%

15

Mizoram

35

37

5%

16

Tripura

88

82

-7%

17

Meghalaya

152

181

19%

18

Assam

1,005

1,115

11%

19

West Bengal

4,387

4,472

2%

20

Jharkhand

2,416

2,550

6%

21

Odisha

3,285

4,125

26%

22

Chhattisgarh

2,544

2,720

7%

23

Madhya Pradesh

2,728

2,935

8%

24

Gujarat

8,197

9,158

12%

25

Daman and Diu

3

0

-92%

26

Dadra and Nagar Haveli

288

284

-2%

27

Maharashtra

17,038

20,305

19%

29

Karnataka

7,915

8,750

11%

30

Goa

344

386

12%

31

Lakshadweep

2

2

36%

32

Kerala

1,828

2,089

14%

33

Tamil Nadu

7,579

8,023

6%

34

Puducherry

161

163

1%

35

Andaman and Nicobar Islands

26

27

5%

36

Telangana

4,166

4,242

2%

37

Andhra Pradesh

2,685

3,174

18%

38

Ladakh

14

23

72%

97

Other Territory

122

149

22%

99

Centre Jurisdiction

141

170

20%

 

Total

91,870

1,01,983

11%

 


[1] Does not include GST on import of goods

***

S.Kakade/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1812435) Visitor Counter : 383