पंतप्रधान कार्यालय
जगज्जेता बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनवर आर.प्रज्ञानानंद याने मात केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त
Posted On:
23 FEB 2022 4:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी 2022
जगज्जेता बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याच्यावर आर.प्रज्ञानंद याने ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत मात केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
ट्विटरद्वारे प्रसिद्ध केलेल्या अभिनंदनपर संदेशात पंतप्रधान म्हणतात;
"अतिशय प्रतिभावान अशा आर.प्रज्ञानानंद याने लहान वयातच संपादन केलेल्या या यशाचा आपल्या सर्वांना अतिशय आनंद झाला आहे. सुप्रसिद्ध जगज्जेता मॅग्नस कार्लसन याच्यावर विजय मिळवण्याच्या त्याच्या कामगिरीचा अभिमान वाटतो. प्रज्ञावान अशा प्रज्ञानानंदाला भविष्यातल्या कामगिरीसाठी शुभेच्छा !"
* * *
N.Chitale/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1800555)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam