पंतप्रधान कार्यालय

सुप्रसिद्ध गांधीवादी शकुंतला चौधरी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 21 FEB 2022 9:23AM by PIB Mumbai

सुविख्यात गांधीवादी कार्यकर्त्या, शकुंतला चौधरी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
या संदर्भात केलेल्या ट्वीट मध्ये पंतप्रधान म्हणाले;

" गांधीवादी मूल्यांचा प्रसार आणि पुरस्कार करण्यासाठी शकुंतला चौधरी जी  कायमच सर्वांच्या स्मरणात राहतील. सरानिया आश्रमात त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा अनेकांच्या आयुष्यावर खूप सकारात्मक परिणाम  झाला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त दु:खद  आहे. त्यांचे कुटुंबिय आणि अनेक अनुयायांप्रती मी माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. ओंम शांती !" 

***

Jaudevi PS/RA/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1799988) Visitor Counter : 163