पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अरुणाचल प्रदेशातील हिमस्खलनाच्या दुर्घटनेत भारतीय लष्कराच्या जवानांच्या मृत्यूबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

Posted On: 08 FEB 2022 9:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 फेब्रुवारी 2022

 

अरुणाचल प्रदेशात झालेल्या हिमस्खलनामध्ये भारतीय लष्कराच्या जवानांचा मृत्यू झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख आणि शोक व्यक्त केला आहे.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले, “अरुणाचल प्रदेशातील हिमस्खलनाच्या दुर्घटनेत भारतीय लष्कराचे जवान मृत्युमुखी पडल्यामुळे अत्यंत दुःखी झालो आहे. आपल्या देशाची या जवानांनी केलेली अनुकरणीय सेवा आपण कधीही विसरणार नाही. या जवानांच्या शोकाकुल कुटुंबियांप्रती मी शोकसंवेदना व्यक्त करतो.

 

* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1796669) अभ्यागत कक्ष : 227