पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या हस्ते श्री रामानुजाचार्य यांच्या 216 फूट ऊंच ‘स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी ’चे लोकार्पण
जगद्गुरु श्री रामानुजाचार्य यांच्या या भव्य मूर्तीच्या माध्यमातून भारत आपल्या मानवी ऊर्जेला आणि प्रेरणेला एक भरीव स्वरुप देत आहे
“ज्यावेळी आपण रामानुजाचार्य यांच्याकडे बघतो, त्यावेळी आपल्याला जाणीव होते की पुरोगामित्व आणि प्राचीनमध्ये काहीही संघर्ष नाही नाही”
“सुधारणांसाठी आपल्याला आपल्या मुळांपासून दूर जाण्याची गरज नाही, किंबहुना आपण आपल्या मुळांशी जोडलेले असणे आवश्यक आहे, त्यातूनच आपल्याला आपल्या खऱ्या शक्तीची जाणीव होते.”
“श्री रामानुजाचार्य यांच्या शिकवणीनुसार वाटचाल करत, आज देश, ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या मंत्रासह आपल्या नव्या भविष्याचा पाया रचत आहे”
“भारतीय स्वातंत्र्यलढ्याला, संतपरंपरेकडून समानता, मानवता आणि आध्यात्माच्या शक्तिचा आशीर्वाद लाभला”
“जर सरदार साहेबांचा ‘एकतेचा पुतळा’ देशाला एकतेच्या शपथेची जाणीव करुन देत असेल, तर, श्री रामानुजाचार्यांचा ‘समतेचा पुतळा’ देशाला समतेचा संदेश देत आहे. हेच, एक देश म्हणून भारताचे वैशिष्ट्य आहे.
“तेलुगू संस्कृतीने देशाच्या विविधतेला अधिक समृद्ध केले आहे”
“तेलुगू चित्रपटसृष्टीने तेलुगू संस्कृतीची भव्य परंपरा समर्थपणे पुढे नेली आहे.”
Posted On:
05 FEB 2022 8:50PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथे श्री रामानुजाचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी म्हणजेच “समतेचा पुतळा’ देशाला समर्पित केला. 216 फुट उंचीचा हा भव्य पुतळा अकराव्या शतकातील भक्तिसंप्रदायाचे पुरस्कर्ते संत श्री रामानुजाचार्य यांचा आहे, श्री रामानुजाचार्य यांनी समाजाच्या सर्व क्षेत्रात, म्हणजे श्रद्धा, जातीपाती आणि पंथ यात समानतेची शिकवण रुजवली. तेलंगणाच्या राज्यपाल तामिळसाई सौंदरराजन, केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या आणि या शुभमूहूर्तावर या पुतळ्याचे लोकार्पण होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “जगद्गुरु श्री रामानुजाचार्य यांच्या या भव्य पुतळ्याच्या उभारणीतून भारत, मानवी ऊर्जेला एक भरीव स्वरुप देत असून हा पुतळा लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल. रामानुजाचार्य यांचा हा पुतळा म्हणजे ज्ञान, आणि आदर्श याचे प्रतीक आहे”असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी यावेळी ‘विश्वकसेन इष्टी यज्ञा’तील पूर्णाहुतिमध्येही सहभाग घेतला. आपले संकल्प आणि उद्दिष्टपूर्तीसाठी हा यज्ञ केला जातो. या यज्ञात पंतप्रधानांनी देशाचा अमृत संकल्प सोडला, आणि हा यज्ञ 130 कोटी देशवासीयांना समर्पित केला.
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी, आपल्या देशातील विद्वानांच्या भारतीय परंपरांचे स्मरण केले या परंपरेत, वाद-प्रतिवादाला आणि समोरच्याचे विचार स्वीकारण्यास आणि नाकारण्यास मुभा होती. “जर आपल्याकडे ‘अद्वैत’ आहे, तर ‘द्वैत’देखील आहे. आपल्याकडे श्री रामानुजनाचार्य यांचा “विशिष्टद्वैत’ आहे ज्यात ‘द्वैत आणि अद्वैत’ दोन्ही आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. रामानुजाचार्य हे ज्ञानाचे शिखर होते, त्याचसोबत ते भक्तिमार्गाचे प्रवर्तक देखील होते. एका बाजूला ते ‘संन्यास’ दीक्षा देणारे संत होते, त्याचवेळी, आपल्या गीता भाष्य मधून त्यांनी कर्मसिद्धांत देखील मांडला. आजच्या जगात, जेव्हा सामाजिक सुधारणांचा, प्रगतीचा विषय येतो, त्यावेळी असे मानले जाते की सुधारणा तेव्हाच होतात, जेव्हा आपण आपल्या मूळापासून दूर जातो. मात्र, ज्यावेळी आपण रामनुजनाचार्य यांच्याकडे बघतो, त्यावेळी आपल्या लक्षात येते, की पुरोगामित्व आणि प्राचीनता यांच्यात काहीही संघर्ष नसतो. सुधारणा करण्यासाठी आपल्या मूळापासून दूर जाण्याची गरज नाही, उलट, आपण जेव्हा आपल्या परांपरांकडे बघतो, तेव्हाच आपल्याला आपल्या खऱ्या शक्तिची जाणीव होते.”
सध्या करण्यात येत असलेले उपाय आणि आपल्या संतांचे ज्ञान यावर पंतप्रधानांनी विस्तृत विवरण केले. श्री रामानुजाचार्य यांनी देशाला सामाजिक सुधारणांची ओळख करून दिली आणि दलित आणि मागासवर्गीयांसाठी काम केले. ते म्हणाले, श्री रामानुजाचार्य, आज समानतेच्या भव्य मुर्तीद्वारे आपल्याला समानतेचा संदेश देत आहेत. या संदेशासोबतच ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या मंत्रा सोबत, आज देश नवीन भविष्याची पायाभरणी करत आहे. कुठल्याही भेदभावाशिवाय सर्वांचा विकास, सर्वांना सामाजिक न्याय यासाठी आज भारत काम करत आहे, जेणेकरून शतकानुशतके ज्यांचे शोषण झाले ते पूर्ण सन्मानाने देशाच्या विकासाचे भागीदार बनतील, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
पक्के घर, उज्वला योजना, 5 लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार किंवा मोफत वीज जोडणी, जनधन खाती, स्वच्छ भारत अभियान या सारख्या योजनांनी दलित, मागास आणि वंचित समुदायांचे सक्षमीकरण केले आहे. श्री रामानुजाचार्य हे ‘देशाच्या एकता आणि अखंडतेची तेजःपुंज प्रेरणा’ आहेत. “त्यांचा जन्म दक्षिण भारतात झाला, पण त्यांचा प्रभाव, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, संपूर्ण भारतावर आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
भारताचा स्वातंत्र्य लढा केवळ सत्तेची आणि आपल्या अधिकारांची लढाई नव्हती, यावर पंतप्रधानांनी भर दिला. या लढ्यात एका बाजूला ‘वसाहतवादी मानसिकता’ होती, आणि दुसऱ्या बाजूला ‘जगा आणि जगू द्या’ ही संकल्पना होती. एकीकडे वांशिक श्रेष्ठतेचा उन्माद आणि दुसऱ्या बाजूला मानवता आणि अध्यात्मावर विश्वास. आणि या लढ्यात भारत आणि त्याच्या परंपरांचा विजय झाला, असे ते म्हणाले. “भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला समानता, मानवता आणि आध्यात्माचे अधिष्ठान होते, जे संत परंपरेतून मिळाले होते,” पंतप्रधान म्हणाले.
सरदार पटेल यांच्या हैद्राबादशी असलेल्या संबंधाचा संदर्भ देऊन पंतप्रधान म्हणाले, “जर सरदार साहेबांचा ‘एकतेचा पुतळा’ देशाला पुन्हा एकदा एकतेची शपथ देत आहे, तर रामानुजाचार्यांचा ‘समतेचा पुतळा’ समानतेचा संदेश देत आहे. एक देश म्हणून हे भारताचे वैशिष्ट्य आहे.”
समृद्ध तेलगु संस्कृती आणि त्यामुळे भारताची विविधता कशी बहरली आहे यावर पंतप्रधानांनी विस्तृत विवेचन केले. या समृद्ध परंपरेचे पथ दर्शक असलेल्या राजे आणि राण्यांच्या दीर्घ परंपरांचे स्मरण केले. भारताच्या पुनरुत्थान आणि भारताच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात पंतप्रधान 13व्या शतकातील काकतीय रुद्रेश्वरा रामप्पा मंदिर युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ आणि जागतिक पर्यटन संघटनेकडून पोचमपल्लीला भारताचे सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून मान्यता मिळाली याबद्दल बोलले.
पंतप्रधानांनी तेलुगू चित्रपट उद्योगाचे गौरवशाली योगदान नमूद केले , जे जागतिक स्तरावर आणि तेलुगू भाषिक प्रांताच्या पलीकडे आपले अस्तित्व निर्माण करत आहे. “ही सर्जनशीलता रुपेरी पडदा आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर अधिराज्य गाजवत आहे. भारताबाहेरही त्यांचे कौतुक होत आहे. तेलगू भाषिक लोकांचे त्यांच्या कला आणि संस्कृतीप्रति हे समर्पण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
हा पुतळा ‘पंचलोहा’, म्हणजेच सोने, चांदी, तांबे, पितळ आणि झिंक या पाच धातूंच्या मिश्रणाने बनलेला आहे आणि जगातील सर्वात उंच आसनस्थ धातूच्या पुतळ्यांपैकी एक आहे. हा ‘भद्रवेदी’ नावाच्या 54-फूट उंच इमारतीवर उभारला आहे, यात वैदिक डिजिटल ग्रंथालय आणि संशोधन केंद्र, प्राचीन भारतीय ग्रंथ, नाट्यगृह, श्री रामानुजाचार्यांच्या विविध कार्यांची माहिती देणारे शैक्षणिक दालन यासाठी समर्पित मजले आहेत. श्री रामानुजाचार्य आश्रमाचे श्री चिन्ना जियर स्वामी यांनी या मूर्तीची संकल्पना मांडली आहे.
या कार्यक्रमादरम्यान, श्री रामानुजाचार्य यांच्या जीवन प्रवास आणि शिकवणीवरील 3D सादरीकरण मॅपिंग दाखवण्यात आले. पंतप्रधानांनी स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीच्या सभोवताली 108 दिव्य देसमच्या (सुशोभितपणे कोरलेली मंदिरे) एकसमान कलाकृतींना भेट दिली.
श्री रामानुजाचार्य यांनी राष्ट्रीयत्व, लिंग, वंश, जात किंवा पंथ यावरून भेदाभेद न करता प्रत्येक मानवाला समानतेच्या भावनेने वागणूक देत लोकांच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम केले. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचे उद्घाटन हा श्री रामानुजाचार्य यांच्या 1000 व्या जयंती सोहळ्याच्या सध्या सुरु असलेल्या 12 दिवसांच्या श्री रामानुज सहस्राब्दी समाँरोहमचा एक भाग आहे.
आज मां सरस्वती की आराधना के पावन पर्व, बसंत पंचमी का शुभ अवसर है।
मां शारदा के विशेष कृपा अवतार श्री रामानुजाचार्य जी की प्रतिमा इस अवसर पर स्थापित हो रही है।
मैं आप सभी को बसंत पंचमी की विशेष शुभकामनाएं देता हूं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 5, 2022
जगद्गुरु श्री रामानुजाचार्य जी की इस भव्य विशाल मूर्ति के जरिए भारत मानवीय ऊर्जा और प्रेरणाओं को मूर्त रूप दे रहा है।
रामानुजाचार्य जी की ये प्रतिमा उनके ज्ञान, वैराग्य और आदर्शों की प्रतीक है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 5, 2022
भारत एक ऐसा देश है, जिसके मनीषियों ने ज्ञान को खंडन-मंडन, स्वीकृति-अस्वीकृति से ऊपर उठकर देखा है।
हमारे यहाँ अद्वैत भी है, द्वैत भी है।
और, इन द्वैत-अद्वैत को समाहित करते हुये श्रीरामानुजाचार्य जी का विशिष्टा-द्वैत भी है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 5, 2022
एक ओर रामानुजाचार्य जी के भाष्यों में ज्ञान की पराकाष्ठा है, तो दूसरी ओर वो भक्तिमार्ग के जनक भी हैं।
एक ओर वो समृद्ध सन्यास परंपरा के संत भी हैं, और दूसरी ओर गीता भाष्य में कर्म के महत्व को भी प्रस्तुत करते हैं।
वो खुद भी अपना पूरा जीवन कर्म के लिए समर्पित करते हैं: PM
— PMO India (@PMOIndia) February 5, 2022
आज जब दुनिया में सामाजिक सुधारों की बात होती है, प्रगतिशीलता की बात होती है, तो माना जाता है कि सुधार जड़ों से दूर जाकर होगा।
लेकिन, जब हम रामानुजाचार्य जी को देखते हैं, तो हमें अहसास होता है कि प्रगतिशीलता और प्राचीनता में कोई विरोध नहीं है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 5, 2022
आज रामानुजाचार्य जी विशाल मूर्ति Statue of Equality के रूप में हमें समानता का संदेश दे रही है।
इसी संदेश को लेकर आज देश ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, और सबका प्रयास’ के मंत्र के साथ अपने नए भविष्य की नींव रख रहा है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 5, 2022
विकास हो, सबका हो, बिना भेदभाव हो।
सामाजिक न्याय, सबको मिले, बिना भेदभाव मिले।
जिन्हें सदियों तक प्रताड़ित किया गया, वो पूरी गरिमा के साथ विकास के भागीदार बनें, इसके लिए आज का बदलता हुआ भारत, एकजुट प्रयास कर रहा है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 5, 2022
रामानुजाचार्य जी भारत की एकता और अखंडता की भी एक प्रदीप्त प्रेरणा हैं।
उनका जन्म दक्षिण में हुआ, लेकिन उनका प्रभाव दक्षिण से उत्तर और पूरब से पश्चिम तक पूरे भारत पर है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 5, 2022
भारत का स्वाधीनता संग्राम केवल अपनी सत्ता और अपने अधिकारों की लड़ाई भर नहीं था।
इस लड़ाई में एक तरफ ‘औपनिवेशिक मानसिकता’ थी, तो दूसरी ओर ‘जियो और जीने दो’ का विचार था: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 5, 2022
आज देश में एक ओर सरदार साहब की ‘Statue of Unity’ एकता की शपथ दोहरा रही है, तो रामानुजाचार्य जी की ‘Statue of Equality’ समानता का संदेश दे रही है।
यही एक राष्ट्र के रूप में भारत की विशेषता है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 5, 2022
पिछले वर्ष ही तेलांगना में स्थित 13वीं शताब्दी के काकातिया रूद्रेश्वर -रामाप्पा मंदिर को यूनेस्को विश्व धरोहर स्थल घोषित किया गया है।
वर्ल्ड टूरिज्म ऑर्गनाइजेशन ने पोचमपल्ली को भी भारत के सबसे बेहतरीन Tourism Village का दर्जा दिया है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 5, 2022
***
N.Chitale/R.Aghor/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1795842)
Visitor Counter : 1629
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam