पंतप्रधान कार्यालय

75 लाख सूर्यनमस्कार घालण्याच्या आव्हानाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

Posted On: 14 JAN 2022 4:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुदृढ आरोग्याचे महत्व अधोरेखित करत 75 लाख सूर्यनमस्कार घालण्याच्या आव्हानाची प्रशंसा केली आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने भारताच्या आघाडीच्या खेळाडूंसोबत 75 लाख सूर्यनमस्कार घालण्याचे आव्हान दिलेल्या ट्वीटला प्रतिक्रिया म्हणून पंतप्रधानांनी ट्वीट केले: सध्या पसरलेल्या महामारीने सुदृढ आयुष्याचे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचे महत्व अधोरेखित केले आहे. तसे करण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न आहे. त्याच वेळी, मी आपणा सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे, मास्क घालण्याचे आणि पात्र असल्यास लस घेण्याचेही आवाहन करतो. असे त्यांनी म्हटले आहे.

 

 

 

S.Tupe/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1792967) Visitor Counter : 84